15 December 2024 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Viral Video | बाईकवर बसलेल्या चिमुकल्याला गाडीने चिरडण्याचा भीषण प्रयत्न, पण बापाने जे केलं ते चमत्कारिक, पहा व्हिडिओ

Viral video

Viral Video | तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, अनेक अपघात घडतात, ज्याचा विचारही कोणी केला नसेल. अनेक वेळा माणूस चुक नसतानाही आपला जीव गमावतो. मात्र, अनेक वेळा जीव वाचविले जातात. आजकाल एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो तुमच्या काळजाचा ठोका चुकवू शकतो. हा व्हिडिओ वडील आणि त्यांच्या चिमुकल्या मुलाशी संबंधित आहे. व्हिडिओमध्ये वडील आपल्या मुलाचा जीव एखाद्या सुपरहिरोप्रमाणे वाचवताना दिसत आहेत.

निष्काळजीपणे वाहन चालवणारे :
रस्त्यावर अत्यंत निष्काळजीपणे वाहन चालवणारे अनेक जण असतात. अशा लोकांमुळेच रस्त्यावर अनेकदा अपघात होतात. विशेष म्हणजे ज्याची काहीही चूक नसते आणि तरीही जीव गमविण्याचा वेळ येते. हा व्हिडिओ देखील पूर्णतः तसा नसला तरी काही प्रमाणात तशाच विषयाशी संबंधित आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला एक बाईक उभी केलेली दिसत आहे. या बाईकवर एक लहान मूल बसलेलं आहे. त्याचवेळी मुलाचे वडीलही त्याच्याजवळ उभे असलेले दिसतात. वडील आपल्या मुलासोबत अगदी आरामात उभे असलेले दिसत आहेत. मग असं काही घडतं, ज्यामुळे वडिलांचा श्वास देखील काही क्षणांसाठी थांबला असावा असं म्हणता येईल.

व्हिडिओ पाहून तुमच्या हृदयाचे ठोकेही वाढतील. आपण व्हिडिओ पाहू शकता की वडिल्यांच्या सतर्कतेमुळे मूल मृत्यूच्या दारातून परतलं आहे असं म्हणता येईल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वडील आपल्या मुलाला धरून उभे आहेत. काही क्षणात काय घडणार आहे याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. प्रत्यक्षात सुपरस्पीड कार अचानक येते. आपण पाहू शकता की कार बाईकला जोरदार धडकते. मात्र, वडिलांनी डोळ्याच्या झगमगाटात सुपरहिरोप्रमाणे तोपर्यंत आपल्या मुलाला बाइकवरून उचलून नेले आहे. एक सेकंदाचाही विलंब झाला असता तर त्या मुलाचा मृत्यू होऊ शकला असता, हे तुम्ही पाहू शकता. या व्हिडीओमध्ये वडील मुलाला आईच्या जवळ देऊन कारचालकाला जोरजोरात ओरडताना पाठीमागे धावताना दिसत आहे.

व्हिडिओ पहा :

 

View this post on Instagram

 

A post shared by TRT World (@trtworld)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of father saved child life by showing amazing agility shocking video viral on social media 11 August 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x