2 May 2025 3:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

VIDEO | आईसोबत बसलेल्या ३ वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेलं | आईने...

three year old boy, Picked up by a leopard, Pathardi

अहमदनगर, ३० ऑक्टोबर: नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरपूर गावाअंतर्गत पानतास वाडी शिवारात तारकनाथ वस्तीवरील सार्थक बुधवंत या ३ वर्षाच्या मुलाला बिबट्याने आईच्या हातातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यात गेल्या १५ दिवसातील ही तिसरी घटना असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

बिबट्या तिनं वर्षाच्या सार्थकला पळवून घेऊन जात असताना आई सुनंदाने बिबट्याचे शेपूट ओढून धरले मात्र आईचे हे प्रयत्न कमी पडले. रात्री उशिरा अकरा वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे. त्यानंतर आजूबाजूच्या गावातील शेकडो तरुणांनी लाठ्या काठ्यासह सभोवतालचा सुमारे ५ किमीचा परिसर पायी पिंजून काढला परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. रात्री उशिरापर्यंत सार्थकचा शोध घेणे सुरू होते. शोध मोहिमेत वनविभाग पोलीस कर्मचारी व शेकडो तरुण सहभागी झाले होते.

तत्पूर्वी बिबट्याने एका ८ वर्षीय मुलावर हल्ला चढवत त्याचा जीव घेतला होता. दरम्यान, त्याचा देखील सार्थक प्रमाणे शोध घेतला असता दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह एका शेतात आढळून आला होता.

दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली आहे. या भागातील ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी बिबट्याला ठार करण्याची मागणी केली आहे. राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही या भागास भेट दिली. येत्या दहा दिवसांत बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशा सूचना त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर दुसरीकडे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यातून मोशन कॅमेरे आणि बोकड चोरीची घटना घडली आहे.

पाथर्डी वन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बिबट्याचा अनुभव नाही. त्यांच्याकडे यंत्रणाही नाही. त्यामुळे बाहेरून पथके बोलाविण्यात आली आहेत. जळगाव येथील पथक दाखल झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातूनही पथके बोलाविण्यात आली आहेत. ज्या भागात बिबट्याचा वावर आढळून आला, तेथे सुमारे पिंजरे लावण्यात आले आहेत.

 

News English Summary: Sarthak Budhwant, a 3-year-old boy from Taraknath in Pantas Wadi Shivara under Shirpur village in Pathardi taluka of Nagar district has been abducted by a leopard from his mother. As this is the third incident in the last 15 days in Pathardi taluka, the citizens are scared.

News English Title: A three year old boy sitting with his mother was picked up by a leopard in Pathardi News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या