12 April 2021 6:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

VIDEO | भलाईचा जमानाच नाही | गाईला वाचवलं आणि गाईने असे आभार मानले

Cow rescue, Viral video, Social media

मुंबई, १६ फेब्रुवारी: समाज माध्यमांवर निरनिराळ्या प्रकारे व्हिडिओ व्हायरल होतं असतात. मात्र त्यातील अनेक विचार करायला भाग पडतात. दरम्यान, सध्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही हसल्याशिवाय राहवणार नाही. एका गाईची मान एका झाडामध्ये अडकलेली असते. तिला वाचवण्यासाठी दोघेजण पुढे येतात. दोघांनी उडी मारून एक फांदी वाकवली आणि गाईची त्या संकटातून सुटका केली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पण झाले असे की गाईची सुटका होताच तिने त्या दोघांवरच हल्ला केला. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अनविष शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी वरती लिहिले आहे की भलाईचा जमानाच नाही राहिला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गाईची मान तिच्या शिंगांमुळे झाडाच्या दोन फांद्यांच्या मध्ये अडकली आहे. ती बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होती. हे पाहून दोघेजण मदतीसाठी पुढे आले.

त्यांनी फांदी खेचून गाईला बाहेर काढलं. सुटका होताच तिने त्या दोघांवरच हल्ला केला. या व्हिडिओला आतापर्यंत २१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तसेच २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि २०० पेक्षा जास्त रिट्विट आहेत.

 

News English Summary: Videos go viral in various ways on social media. But many of them have to think. In the meantime, watching the current video will not leave you without a smile. A cow’s neck is stuck in a tree. The two come forward to save her. The two jumped and bent a branch and rescued the cow from that predicament.

News English Title: Cow rescue videos gone viral in various ways on social media news updates.

हॅशटॅग्स

#SocialMedia(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x