5 May 2025 2:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | 32 टक्के परतावा मिळेल, अशी संधी सोडू नका, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | 67 टक्के कमाईची संधी; या बातमीनंतर पेनी स्टॉकची जोरदार खरेदी सुरु - NSE: IDEA Adani Green Share Price | अप्पर सर्किट हिट, अदानी ग्रीन शेअरमध्ये तुफान तेजी, टार्गेट जाणून घ्या - NSE: ADANIGREEN Rattan Power Share Price | 10 रुपयांच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले; अपसाईड टार्गेट - NSE: RTNPOWER AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
x

High Alert | मुंबईकरांसाठी हवामान खात्याकडून रेडअलर्ट | पुढील ३-४ तास धोक्याचे

Mumbai Rain

मुंबई, २१ जुलै | हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगराच्या परिसरात वेगवान वाऱ्यांसह पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमधील सततच्या पावसामुळे मिठी नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. अशातच बुधवारी सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस सुरुच राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा जलमय होण्याची शक्यता आहे. मुंबईसोबतच राज्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईला पुढील तीन ते चार तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील दोन ते तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट राहणार आहे. त्यामुळे पुढील चार दिवस मुंबईकरांसाठी पावसाचे ठरणार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून मुंबईकरांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्टात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच मराठवाड्यातही चांगल्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यात आहे. येत्या ४८ तासांसाठी कोकणामध्ये रेडअलर्ट जारी केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai city rain high alert weather report news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#WeatherForecast(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या