16 December 2024 3:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

त्या अधिकाऱ्यांना PoK'वर पाठवा म्हणाले होते; अन राज्याच्या प्रधान सचिवपदी बढती दिली

IAS Officer Ashwini Bhide, Metro 3, Save Aarey

मुंबई: राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज मुंबई मेट्रो -३ च्या संचालक अश्विनी भिडे यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अश्विनी भिडे यांना आता प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. तसेच एमएमआरसीएल आणि मेट्रो -३ चे संचालकपदही अश्विनी भिडे यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. आरे येथील मेट्रो-३ च्या कारशेडच्या मुद्द्यावरून अश्विनी भिडे आणि शिवसेना यांच्यात तीव्र मतभेद झाले होते. मात्र हे मतभेद बाजूला ठेवत अश्विनी भिडे यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

दरम्यान, अश्विनी भिडे यांना मिळालेल्या पदोन्नतीमुळे मुंबई आणि परिसरात मोठी गुंतवणूक करून सुरू करण्यात आलेल्या विकास प्रकल्पांना महाविकासआघाडीच्या सरकारकडून कुठल्याही प्रकारची स्थगिती दिली जाणार नाही. तसेच या प्रकल्पांचे काम पूर्वनियोजित पद्धतीनेच पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तत्पूर्वी, आरेतील वृक्षतोडीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आरेमध्ये रात्रभर झाडं कापण्यात आली. त्याच संध्याकाळपर्यंत जवळपास ३५० हून अधिक झाडांवर कुऱ्हाड फिरवण्याची माहिती तेथील स्थानिकांनी दिली होती. त्यावेळी मोठ्या संख्येने पोलीस सुरक्षाही या परिसरात होती. पर्यावरण प्रेमींना याची माहिती मिळताच त्यांनी आरेमध्ये धाव घेत झाडं कापण्याला तीव्र विरोध केला होता. आंदोलने करत झाडांची कत्तल करण्यास जोरदार अटकाव केला होता. त्या सर्व परिस्थितीमुले रात्रभर आरेत तणावाचे वातावरण होते. येथे उपस्थित पोलिसांनी काही आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

‘उच्च न्यायालयाने या प्रश्नावरील आमची याचिका तांत्रिक कारणावरून फेटाळली असून सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सुचवले होते. त्यामुळे आम्ही तातडीने सर्वोच्च न्यायालयात जाऊ’, असे ‘वनशक्ती’चे याचिकादार डी. स्टॅलिन यांनी प्रसार माध्यमांना सांगितले होते. दरम्यान, ‘मेट्रो ३’साठी रात्रीच्या अंधारात आरे कॉलनीतील झाडांवर कुऱ्हाड चालवणं हा लज्जास्पद आणि किळसवाणारा प्रकार आहे. झाडे तोडण्यासाठी इतकी तत्परता दाखवणाऱ्या या अधिकाऱ्यांना ‘पाकव्याप्त काश्मीर’मध्ये पाठवा आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची ड्युटी द्या,’ असा जोरदार हल्ला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी चढवला होता.

दुसऱ्या ट्विटमध्ये आदित्य यांनी शिवसैनिकांनी आरेतील वृक्षतोड थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले होते. ‘आरे कारशेड परिसरातील अनेक पर्यावरणवादी तसेच स्थानिक शिवसैनिकांनी वृक्षतोड करण्याचा हा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ज्यापद्धतीने आपण मुंबई मेट्रो तीनसाठी जंगल नष्ट करत आहोत ते पाहता हा प्रकल्प भारताने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत मांडलेले सर्व दावे खोडून टाकताना दिसत आहे,’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.

 

Web Title:  Metro3 Ashwini Bhide got Promotion Principal Secretary of Maharashtra.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x