3 May 2024 11:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मूळ आडनाव बदलून 'भारतीय' केलं, पण गुजराती-मारवाडी-युपीच्या नेत्यांमध्येच भाजपचा भारत?

BJP Leader Mohit Kumboj

मुंबई: ‘कंबोज हे स्वतःच मूळ आडनाव बदलून ‘भारतीय’ करून त्यावर मोठा इव्हेंट देखील भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील नेते मोहित कंबोज यांनी भरवून आणला होता. मात्र या महाशयांच्या ‘भारतीय’ या व्याख्येत अजून गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय एवढ्याच समाजाचा भारत सामावलेला आहे असंच म्हणावं लागेल. त्यात असे प्रश्न भाजपच्या नेत्यांना केवळ महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाबाबतच पडत असल्याने काळाच्या मंत्रिमंडळात गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय नेत्यांना स्थान मिळालं नसल्याने त्यांना वेगळीच पोटदुखी होऊ लागल्याचं दिसतं.

कारण मोहित भारतीय यांच्यामधील महाराष्ट्र केंद्रित ‘भारतीयाला’ सध्या महाविकास आघाडीत गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय नेत्यांना स्थान नसल्याने शिवसेनेला लक्ष केलं आहे. विशेष म्हणजे या महाशयांना असे प्रश्न गुजरात, बिहार किंवा उत्तर प्रदेशातील मंत्रिमंडळात मराठीला स्थान का नाही असे ‘भारतीय’ नात्याचे प्रश्न अजिबात पडत नाहीत. कारण महाराष्ट्रातील यांची दुकानच मुळात गुजरात, बिहार किंवा उत्तर प्रदेशातील मतपेटीवर अवलंबून असतात आणि त्यामुळेच संपूर्ण भारत ते केवळ गुजरात, बिहार किंवा उत्तर प्रदेशातील लोकांमध्येच पाहतात. त्यासंदर्भात त्यांनी एक ट्विट देखील आहे. परंतु, या महाशयांना हे माहीतच नाही की मुंबई आणि महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून या समाजाचे आमदारच नाहीत.

भाजप नेते मोहित भारतीय यांच्यामधला ‘भारतीय’ एखादं ट्विट करून मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ किंवा बी एस येदुइरप्पा यांना गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकच्या मंत्रिमंडळात मराठीला स्थान का नाही असे प्रश्न करण्यास धजावणार नाहीत. मात्र महाराष्ट्रात स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी सर्व काही करण्यास ते नेहमीच तयार असतात आणि बाकी त्यात गुजरात, बिहार किंवा उत्तर प्रदेशातील समाजाचं देखील भलं करणं हे उद्देश नसतो तर केवळ स्वतःची राजकीय पत निर्माण करण्याची केलेली धडपड असंच म्हणता येईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेड आणि नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिले होते. परंतु यामुळे विरोधी पक्षात असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सध्या सुरु असून…घाई करा थोडेच दिवस बाकी आहेत असा टोला भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी आता दाऊदलाही क्लीन चीट मिळेल असं ट्विट करत आरे बचाव आंदोलकांवरील गुन्हांची तुलना थेट दाऊदवरील गुन्हांशी करत स्वतःच्या अकलेचे प्रदर्शन समाज माध्यमांवर मांडल्याचे सर्वशुत आहे आणि त्यात हा नवा ‘भारतीय’ प्रयोग म्हणावा लागेल.

 

Web Title:  BJP Leader Mohit Kumboj worry about Gujarat Marwadi and Uttar Bharatiya Leaders do not got opportunity in State Cabinet Ministry.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x