3 May 2025 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
x

पवारांची तिसरी पिढी राजकारणात? पार्थ अजित पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार?

पुणे : आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकीत अनेक राजकीय दिग्गज त्यांची पुढची पिढी राजकारणाच्या आखाड्यात उतरविण्याची शक्यता आहे. त्यात ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंब म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील अविभाज्य घटक हे सर्वश्रुत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे याआधीच सक्रिय राजकारणात आहेत, तर राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे सुद्धा मोठ्या प्रमाणावर पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत आहेत.

राज्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या म्हणजे राजकीय आखाड्यात उतरू शकतात. सध्या मावळ मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि सेनेचे श्रीरंग बारणे या मतदार संघाचे खासदार आहेत.

मागील निवडणुकीत याच मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून राहुल नार्वेकर राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यांना १ लाख ८२ हजार २९३ मत पडली होती आणि ते तिसऱ्या स्थानी फेकले गेले होते तर शिवसेनेचे विजयी उमेदवार श्रीरंग बारणे यांना ५ लाख १२ हजार २२३ इतकी मत पडली होती. परंतु त्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती आणि त्याचा थेट फायदा एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला झाला होता. परंतु जर यावेळी स्वतः अजित पवारांचे चिरंजीव उमेदवार असले तर राष्ट्रवादी आणि पवार कुटुंब सर्व शक्ती पणाला लावेल, त्यामुळे शिवसेनेचा मार्ग कठीण होऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. अजित पवारांचे पुतणे रोहित पवार या आधीच जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात आले आहेत, त्याचा फायदा सुद्धा पार्थ पवार याना होऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या