मुंबई, 08 नोव्हेंबर | समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या पुरावा” असं लिहित नवाब मलिक यांनी ट्विटरवर काही कागदपत्रे पुरावे (Kranti Redkar Sameer Wankhede) म्हणून सादर केले होते.

Kranti Redkar Sameer Wankhede. This case is about 13-14 years old. When a case was filed against Harshda Redkar in a drug case, Kranti Redkar and I were not even married, explained Sameer Wankhede :

अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात असल्याचा गंभीर आरोप ट्विटरवरुन केला होता. त्यानंतर खुद्द वानखेडेंनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. हे प्रकरण जवळपास 13-14 वर्ष जुनं आहे. हर्षदा रेडकर यांच्यावर ड्रग्ज प्रकरणात केस झाली, तेव्हा माझा आणि क्रांती रेडकर यांचा विवाहही झाला नव्हतं, असं समीर वानखेडेंनी स्पष्ट केलं.

दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या या ट्विटनंतर आता समीर वानखेडे यांनी देखील नवाब मलिकांना उत्तर दिलं आहे. मलिकांनी केलेल्या ट्विटबद्दल जेव्हा वानखेडे यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, ‘जेव्हा 2008 साली हे प्रकरण घडलं तेव्हा मी सेवेत देखील नव्हतो. मी 2017 साली क्रांती रेडकरशी लग्न केलं आहे. मग तरीही माझा या खटल्याशी संबंध कसा?’ असं प्रति सवाल वानखेडे यांनी नवाब मलिक यांना केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Kranti Redkar Sameer Wankhede reaction on Harshda Redkar drug case.

इतरांच्या जुन्या व्हाट्सअँप हिस्टरीवरून कारवाई करणाऱ्या वानखेडेंची मेहुणीच्या ड्रग हिस्टरी प्रकरणावर अशी प्रतिक्रिया