26 January 2022 11:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund Investment | या म्युच्युअल फंडांत पैसे गुंतवा | गुंतवणुकीवर तगडा परतावा मिळेल | यादी पहा Zomato Share Price | दुप्पट कमाईसाठी स्वस्त झालेला झोमॅटो शेअर खरेदी करा | तज्ज्ञांचा सल्ला पहा Multibagger Penny Stock | 8 रुपयाच्या पेनी शेअरची कमाल | 400 टक्क्यांहून अधिक रिटर्न | सध्या मिळतोय स्वस्त Penny Stocks | काल 1 दिवसात या 10 पेनी शेअर्समधून तब्बल 10 टक्क्यांपर्यंत कमाई | यादी सेव्ह करा PPF Investment | या सरकारी योजनेत दररोज इतके पैसे जमा करून कोटीचा निधी जमा होईल | जाणून घ्या माहिती Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा | गुंतवणूक सुरक्षित आणि नफ्यात राहील Stock To BUY | मोठ्या नफ्यासाठी मल्टिबॅगर स्टॉक निओजेन केमिकल्स खरेदी करा | HDFC सिक्युरिटीजचा सल्ला
x

धक्कादायक | समीर वानखेडेंची मेहुणी आणि क्रांती रेडकरची बहीण हर्षदा रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात | मलिक यांच्याकडून पुरावे

Sameer Wankhede's sister in law into drugs business

मुंबई, 08 नोव्हेंबर | राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक हे गेले अनेक दिवस एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर एकामागून एक आरोप करत आहेत. असं असताना सोमवारी (8 नोव्हेंबर) नवाब मलिक यांनी एक नवं ट्विट करुन पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. यावेळी मलिक यांनी समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्स व्यवसायात आहे का? असा थेट सवाल (Sameer Wankhede’s sister in law into drugs business) विचारला आहे.

Sameer Wankhede’s sister in law into drugs business. Is Harshda Dinanath Redkar, sister of Sameer Wankhede’s wife actress Kranti Redkar, involved in drug business? This question has been asked by Nawab Malik :

समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर ही ड्रग्जच्या व्यवसायात गुंतली आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर या प्रकरणातील एक केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे. असं देखील नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे.

काय म्हणाले नवाब मलिक?
नवाब मलिक यांनी नुकतेच पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणात आणखी काही गौप्यस्फोट केले होते. हे ‘मेरा नाम जोकर’ आणि ‘संगम’ या दोन इंटरव्हलचे पिक्चर नाहीत. जोपर्यंत व्हिलन आत जात नाही, तोपर्यंत पिक्चर संपणार नाही. ललित हॉटेल सात महिने बुक होते. तिथूनच प्रायव्हेट आर्मी काम करत होती. विलास भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसूजा असे अनेक जण येत होते. तिथे मुलीही येत होत्या. तिथे ड्रग्जही घेतलं जात होतं. ललितमध्ये शबाब आणि कबाब सुरु होते. फक्त नवाब नव्हता. हे सर्व तुमचेच लोक होते. समीर वानखेडेंच्या प्रवक्त्यानेच ती माहिती दिली, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sameer Wankhede’s sister in law into drugs business said Nawab Malik.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x