27 April 2024 8:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

शिवसेनेसाठी आंदोलनात पोलिसांच्या लाठ्याकाठ्या झेलणाऱ्या मोहसीन शेख यांना युवासेनेत सहसचिवपदी बढती

Aaditya Thackeray

मुंबई, २७ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील घराबाहेर राडा कारणाऱ्या आणि युवासेनेची ताकद दाखवून देणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं बक्षीस दिलंय. आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर समाज माध्यमांवर मोहसीन शेख यांच्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. कारण शिवसेनेसाठी आंदोलनात पोलिसांच्या लाठ्याकाठ्या झेलणाऱ्या मोहसीन शेख यांना युवासेनेत सहसचिवपदी बढती देण्याचा निर्णय थेट आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे.

शिवसेनेसाठी आंदोलनात पोलिसांच्या लाठ्याकाठ्या झेलणाऱ्या मोहसीन शेख यांना युवासेनेत सहसचिवपदी बढती – Environment minister Aaditya Thackeray promoted Mohsin Shaikh as joint secretary in Yuvasena :

कोण आहेत मोहसीन शेख, राजकीय पार्श्वभूमी कोणती?
मोहसीन शेख शिवसेनेत येण्याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. परंतु काही कारणांनी त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या 2 वर्ष अगोदर म्हणजेच 2017 ला राष्ट्रवादीला बायबाय करत शिवसेना भगवा झेंडा खांदयावर घेतला. शिवसेनेत आल्यापासून त्यांनी चांगलं काम केलं. गेल्या 4 वर्षात आपल्या कामाने त्यांनी पक्षनेतृत्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.

उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आदित्य ठाकरे यांनी मोहसीन शेख यांची सहसचिवपदी नियुक्ती केली. पण बी नियुक्ती तात्पुरत्या स्वुरुपातील असून सहा महिन्यानंतर पदाधिकाऱ्याचे काम बघून कायम करण्यात येईल, असं युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने सांगितले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Environment minister Aaditya Thackeray promoted Mohsin Shaikh joint secretary in Yuvasena

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x