5 May 2024 6:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

बलात्काराच्या घटनेनंतर मोदींच्या गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलन पेटलं

अहमदाबाद : गुजरात राज्यातून सध्या उत्तर प्रदेशातील आणि बिहारच्या कामगारांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे. कारण चिमुकल्या मुलीवर क्रूर पणे बलात्कार झाल्यानंतर गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात संतापाची लाट उसळली आहे. बुधवारपासून गुजरातच्या गांधीनगर, मेहसाणा, पाटन, साबरकाठा ते अगदी अहमदाबाद या ५ जिल्ह्यांमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलनांनी पेट घेतला आहे. या हिंसक हल्ल्यात यूपी आणि बिहारी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले जात आहे.

त्यामुळे बिघडलेल्या परिस्थितीमुळे गुजरातमधील अनेक उत्तर भारतीय आणि बिहारच्या कामगारांनी पळ काढला आहे. त्यामुळे चिघळत चाललेल्या परिस्थितीमुळे गुजरात पोलिसांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. गुजरातच्या गांधीनगर, मेहसाणा, पाटन, साबरकाठा ते अगदी अहमदाबाद या ५ जिल्ह्यांमधून गुजरात पोलिसांनी तब्बल १८० जणांना अटक केली आहे. गेल्या आठवड्यात गुजरातच्या साबरकाठा जिल्ह्यात एका १४ महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर विषय पेट घेण्याआधी पोलिसांनी या प्रकरणात रविंद्र साहू या आरोपीला अटक केली आहे. रविंद्र साहू हा मूळचा बिहारचा आहे हे समोर येताच, त्याच्या अटकेनंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीय आणि बिहारच्या कामगारांवर हिंसक हल्ले होण्यास सुरुवात झाले.

गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी परिस्थितीवर बोलताना म्हटलं आहे की, बाहेरच्या राज्यातून आलेल्या नागरिकांना गुजरातमध्ये अनेक ठिकाणी लक्ष्य केले जात आहे. आम्ही हे अजिबात सहन करणार नाही. आतापर्यंत पोलिसांनी एकूण १५० पेक्षा जास्त आरोपींना अटक केली आहे तसेच परप्रांतीय ज्या भागात मोठ्या संख्येने रहातात तिथे पोलिसांच्या गस्त वाढवल्या आहेत.

चिमुकल्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर विशिष्ट समाजाचे लोक परप्रांतीयांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करत आहेत असे डीजीपी शिवानंद झा यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. या हल्ल्या प्रकरणी ठाकोर समाजाच्या लोकांनावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने अल्पेश ठाकोर यांनी ७२ तासांच्या आत आमच्या समाजाच्या लोकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी उचलून धरली आहे. तसेच त्यांनी शांततेचं आवाहन सुद्धा केलं आहे. आमची आणि ठाकोर सेनेची बदनामी करण्याचा हा कट आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x