28 April 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
x

आम्हाला मोदी भक्त म्हटलं जातं अंध भक्त नाही: भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ

मुंबई : भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी नवा जावई शोध लावला आहे. त्यांच्या महान अध्यात्म ज्ञानानुसार नरेंद्र मोदी म्हणजे भगवान विष्णूचा ११ वा अवतार असल्याचं वादग्रस्त ट्विट त्यांनी केलं आहे. भारताच्या हिंदू संस्कृतीत ३३ कोटी देव आहेत, पंचमहाभुतं आहेत, तसेच भारतमातेला आपण देव मानतो. पंतप्रधान हे देशाचे प्रधानसेवक असून ते भारतमातेची सेवा ज्याप्रमाणे करत आहेत त्याचा विचार करता आमच्यासाठी ते देवासमानच आहेत, असे वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच मी ते सर्व भावनेतून त्यांना विष्णूचा अकरावा अवतार म्हटलं आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिल आहे.

प्रभू रामचंद्राने जन्म घेतला होता तो या जगाच्या कल्याणासाठी आणि हितासाठी त्याने रामराज्य आणले. श्रीकृष्णाने सुद्धा देवकीच्या पोटी जन्म घेतला होता त्याप्रमाणे पंतप्रधान मोदी हे आमच्यासाठी देवच आहेत असे सुः वाघ यांनी स्पष्ट सांगितले. जनतेसाठी उत्तम काम करणाऱ्या पंतप्रधानांना आम्ही देवच समजतो आणि त्यात काही सुद्धा गैर नाही, असं सुद्धा अवधूत वाघ यांनी म्हटलं आहे. आम्हाला मोदी भक्त म्हटलं जातं अंध भक्त नाही, त्यामुळे जे बोललो आहे ते माझ्या मनात पंतप्रधानांबाबत जी तीव्र भावना आहे त्या भावनेतूनच व्यक्त झालो आहे, असे सुद्धा अवधूत वाघ बोलले आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x