जयपूर : पुढील महिन्यात राजस्थानसह एकूण ५ राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्यापैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या ३ राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. परंतु निवडणूक पूर्व सर्वे निसार या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचा पराभव होणार असा निष्कर्ष समोर आला आहे. त्यामुळे मोदी सरकारने सुद्धा धास्ती घेतली असून स्वतः आरएसएस सुद्धा वेगळे सर्वेक्षण करून घेत आहे.

दरम्यान, भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये भाजपचा धुव्वा उडण्याचे निष्कर्ष समोर येत आहेत. तसेच स्थानिक मतदार मंत्र्यांसोबत अनेक आमदारांवर प्रचंड नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार भाजपचे तब्बल १०० आमदार मतदारांच्या रडारवर असून यांना पुन्हा तिकीट मिळाल्यास भाजपचा राजस्थानमध्ये कुळाक्ष होईल अशी शंका खुद्द भाजपच्या दिल्लीश्वरांना सुद्धा आली आहे. इतकंच काय तर जवळपास ८० ते १०० आमदारांवर नमो आपमध्ये प्रचंड नकारात्मक प्रतिक्रिया आल्याने भाजपने धास्ती घेतली आहे.

त्यामुळे एकूण १६० आमदारांपैकी तब्बल १०० आमदारांना यंदा तिकीट नाकारण्यात येणार आहे असे खात्रीलायक वृत्त आहे. त्यात आस्ट्रिसिटी कायद्यामुळे स्थानिक राजपूत समाज भाजपवर प्रचंड संतापला आहे असे समजते. केवळ मंत्री आणि आमदारच नाही तर भाजपच्या निरीक्षकांन बद्दल सुद्धा लोकांमध्ये प्रचंड रोष आहे असा स्थानिक भाजपकार्यकारणीचा अनुभव आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देऊन १०० विद्यमान आमदारांना नारळ दिला जाणार अशी भाजपमधील सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान, भेदरलेल्या राजस्थान भाजपने सर्वच मतदारसंघात मोदींच्या सभेचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. परंतु रोष हा भाजपवर आहे आणि मोदी सुद्धा भाजपचे पंतप्रधान आहेत याचा त्यांना विसर पडला आहे, असं चित्र आहे.

Rajasthan BJP may reject tickets to 100 MLAs in Assembly election in next month