29 April 2024 7:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

अलोक वर्मांकडे राफेल, अर्थ आणि कोळसा खात्या सकट ७ महत्वाच्या फाईल्स होत्या?

नवी दिल्ली :  सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या सीबीआय संचालकांकडे राफेल, अर्थ आणि कोळसा खात्या सकट ७ महत्वाच्या फाईल्स होत्या अशी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या सात महत्वाच्या फाईल्स अगदी शेवटच्या टप्यात असताना अलोक वर्मांकडून त्यांच्याकडील अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे विरोधकांना या प्रकरणात वेगळाच संशय येत आहे.

सध्या देशातील राजकीय वातावरण सीबीआय विरुद्ध सीबीआय असं तापलं आहे. त्यानंतर केंद्र सरकारने ताबडतोब सीबीआय संचालक अलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. अशाप्रकारे वर्मा यांच्याकडील अधिकार काढून घेताना त्यांच्या टेबलवर देशातील ७ महत्वाच्या प्रकरणांच्या फाईल्स होत्या असं समोर येत आहे.

त्या फाईल्सची माहिती पुढील प्रमाणे;

  1. या महत्वाच्या फाईल्सपैकी एक फाइल राफेल डील प्रकरणी आहे. याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भुषण यांनी ४ ऑक्टोबर रोजी १३२ पानांचे तक्रार पत्र सीबीआयकडे दाखल केले आहे. यामध्ये फ्रान्सकडून घेण्यात येणाऱ्या राफेल विमानांच्या खरेदीतील अनियमिततेवर आक्षेप घेण्यात आला आहे. या तक्रारीची पडताळणी सध्या सीबीआयकडून करण्यात येत आहे. यावर निर्णयही घेण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते.
  2. त्याचबरोबर दुसरे प्रकरण हे मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियामधील लाच प्रकरणाचे आहे. यामध्ये निवृत्त हायकोर्टाचे न्यायाधीश आय. एम. कुद्दूसी यांचा समावेश आहे. याप्रकरणी न्या. कुद्दूसी यांच्यावर सीबीआयकडून आरोपपत्रही दाखल करण्यात आले असून त्यावर केवळ वर्मा यांची सही होणे बाकी आहे.
  3. तिसरे प्रकरण हे मेडिकल प्रवेशासंदर्भातील गैरव्यवहाराचे आहे. यामध्ये अलाहाबाद हायकोर्टाचे न्या. एस. एन. शुक्ला यांच्यावर मेडिकल प्रवेशासंदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. न्या. शुक्ला यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. या प्रकरणीही फाइल तयार असून त्यावर वर्मा यांची सही होणे बाकी आहे.
  4. अर्थ खात्यातील आखणी एका प्रकरणावर वर्मा सध्या काम करीत होते. भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात सीबीआयकडे तक्रार दाखल केली असून यामध्ये अर्थ आणि महसूल सचिव हसमुख अधिया यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोळसा खाण वाटप प्रकरणात पंतप्रधानांचे सचिव आयएएस अधिकारी भास्कर खुलबे यांची चौकशी सीबीआयकडून सुरु आहे.
  5. दिल्लीतील एका मध्यस्थ व्यक्तीवर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सीबीयाकडून छापेमारी करण्यात आली होती.
  6. राजकीय व्यक्तींच्यावतीने लाच घेणे आणि सार्वजनिक क्षेत्रातील वरिष्ठ पदाच्या बेकायदा नियुक्त्यांमध्ये त्याचा हात आहे. संबंधित व्यक्तीने यासंदर्भात लाच घेतली असून त्याच्याकडे ३ कोटी रुपयांची रोकड सापडली होती.
  7. त्याचबरोबर संदेसरा आणि स्टर्लिंग बायोटेकचे महत्वाचे प्रकरण सीबीआयकडे आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत आली असून यामध्ये सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी अस्थाना यांनी सुमारे ३ कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने आपल्याच क्रमांक दोनच्या या अधिकाऱ्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x