3 May 2024 8:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

शेतकऱ्यांची चेष्टा; फडणवीस सरकारकडून बॅटरीच्या प्रकाशात शेताचे दाखले व पीकाचा सर्वे

बीड : सध्या ग्रामीण महाराष्ट्रावर तीव्र दुष्काळाचे सावट आहे. त्यात सरकारने सध्या केवळ ‘दुष्काळ सदृश्य’ परिस्थिती असा उल्लेख केल्याने विरोधकांनी रोष व्यक्त केला असताना फडणवीस सरकारचा शेताचे दाखले आणि पीकाचा दिखाऊ सर्वे समोर येत आहे. कारण, सध्या महाराष्ट्र सरकारकडून दुष्काळी ग्रामीण भागाची पाहणी सुरु आहे. परंतु, धक्कादायक म्हणजे राज्य मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बीडमध्ये रात्रीच्या वेळेला चक्क बॅटरीच्या प्रकाशात पीक पाहणी केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. पुढे असेच दिखाऊ प्रकार आणि सर्वे अनेक भागात होऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काल म्हणजे शनिवारी रात्री उशिरा दुष्काळाची पाहणी करण्यासाठी नित्रुड या गावात राज्यमंत्री संभाजी पाटील निलंगेकर गेले होते. दरम्यान, त्यावेळी गावाशेजारी विजेची सुविधा नसल्याने त्यांनी चक्क लहान बॅटरीच्या प्रकाशात शेताचे दाखले आणि पीकाचा सर्वे केला. दुसरं धक्कादायक म्हणजे हा संपूर्ण गावाचा सर्वे त्यांनी केवळ २० मिनिटांत पूर्ण केला, त्यामुळे फडणवीस सरकार सर्वेच्या नावाखाली राज्यातील शेतकऱ्यांची केवळ चेष्टा करत आहे का, अशी शंका शेतकरी उपस्थित करत आहेत.

दरम्यान, रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या प्रकाशात सर्वे केल्याने सरकार या विषयावर किती गंभीर आहे याचा प्रत्यय येऊ लागला आहे. दिवसा ढवळ्या सर्वे करून शेतकऱ्यांना नीट भरपाई मिळत नसताना आता रात्रीच्या अंधारात सरकारला काय नुकसान दिसणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सरकारच्या या दिखाऊ सर्व्हमुळे दुष्काळात होरपळणारा शेतकरी अजूनच अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या विषयावर विरोधक काय भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x