24 January 2025 7:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, नोमुरा इंडिया ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS HFCL Share Price | एचएफसीएल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: HFCL Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON NBCC Share Price | 91 रुपयांचा एनबीसीसी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC IRFC Share Price | आयआरएफसी शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला - NSE: IRFC Nippon India Growth Fund | पगारदारांनो, श्रीमंत करतेय या फंडाची योजना, 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 4 कोटी रुपये परतावा मिळेल
x

छगन भुजबळांना जीवे मारण्याचं धमकी पत्र

नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे वृत्त आहे. जर तुम्ही मनुस्मृतीला विरोध केला तर आम्ही तुमचा सुद्धा दाभोलकर, पानसरे करु असे धमकी पत्र भुजबळांना आल्याची बातमी आहे. भुजबळांच्या नाशिकमधील ‘भुजबळ फार्म’ हाऊसवर एका निनावी पत्राद्वारे ही धमकी देण्यात आल्याचं समजतं. दरम्यान, एनसीपीच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी नाशिक पोलिस आयुक्तांची भेट घेऊन, यासंदर्भात रीतसर तक्रार नोंदवणार असल्याची माहिती दिली आहे.

तसेच आम्हाला मनुस्मृती नकोय तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान हवं आहे, असे छगन भुजबळांनी काही दिवसांपूर्वी नागपुरात विधान केले होते. तसेच, छगन भुजबळांनी अनेक वेळा मनुस्मृतीचा जाहीर निषेध नोंदवला आहे. दरम्यान, भुजबळांना धमकीचं पत्र मिळाल्याचं वृत्त पसरताच भुजबळ फार्मवर मोठ्या प्रमाणात एनसीपीचे कार्यकर्ते गोळा होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच या धमकी पत्राची लवकरात लवकर सखोल चौकशी व्हावी आणि सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी एनसीपीचे कार्यकर्ते करत आहेत.

 

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x