8 May 2024 10:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Infra Share Price | तज्ज्ञांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअर्सचा सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट जाहीर, टार्गेट प्राईस जाहीर IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी Bajaj Pulsar NS400Z | नवीन पल्सर NS400Z पेट्रोल सह E20 इंधनाने सुद्धा धावणार, पैशाची महाबचत Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय?
x

मोदी सरकारच्या बँकिंग क्षेत्रातील धोरणांविरोधात बँका संपावर, ५ दिवस बँका बंद

नवी दिल्ली : देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या मागील सर्व प्रलंबित मागण्यासाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने अर्थात ‘AIBOC’ उद्यापासून तब्बल ५ दिवसांसाठी संपावर जाणार आहेत. त्यात हे ५ दिवस आल्याने अनेकांची आर्थिक गैरसोय होण्याची शक्यता आहे. उद्या २० डिसेंबरनंतर सलग ५ दिवस बँका बंद राहणार असल्यानं २० तारखेच्या आधीच आपण बँकांमधील सर्व महत्वाचे व्यवहार आटोपून घ्यावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

मोदी सरकारच्या बँकिंग क्षेत्रातील धोरणाविरोधात हा संप देशव्यापी संप पुकारण्यात आला असून, बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला संघटना धारेवर धरणार आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मुद्दा सुद्धा या संपाच्या मूळ केंद्रस्थानी असणार आहे.

त्यात २२ आणि २३ डिसेंबरला शनिवार, रविवार असल्यानं वास्तविक बँकांना सुट्टीच असते. परंतु, २५ डिसेंबरला ख्रिसमसची सुद्धा सुट्टी असल्यानं बँका ५ दिवस बंद राहणार आहेत असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x