17 May 2024 4:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

नववर्षाचं स्वागत सिद्धिविनायकाच्या आरतीने

मुंबई : जगभरात सध्या नववर्षाची धूम पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांवर मध्यरात्री मुंबईकरांसह राज्यातून न्यू ईअरचे सेलिब्रेशन करण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. मध्यरात्रीच्या सेलिब्रेशननंतर आता, नववर्षाची सुरुवात श्री. सिद्धिविनायकाच्या चरणी नमन करून होते आहे. त्यामुळे भाविकांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

मुंबईकरांच आराध्य दैवत आणि प्रसिद्ध गणेश मंदिर असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात नववर्षाची सुरुवात श्रींच्या आशीर्वादाने आणि आरतीने झाली आहे. नववर्ष मंगलमय, आनंददायी आणि सुखकर जाण्यासाठी सुखकर्ता-दुखहर्ता विघ्नविनायकाच्या चरणी भक्तगण आणि समस्त मुंबईकर नतमस्तक होत आहेत. ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन केल्यानंतर सुद्धा श्री. गणरायाच्या दर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात करण्याचा मोह भक्तांना आवरू शकला नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण आणि तरुणींचा सुद्धा समावेश आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x