29 April 2024 11:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय
x

गुंतवणुकदारांचे पैसे थकवले, भाजपचे मंत्री सुभाष देशमुखांच्या लोकमंगल'ची खाती सेबीकडून सील

सोलापूर : गुंतवणुकदारांचे तब्बल ७४ कोटी रुपये परत करण्याचे सेबीचे आदेश धुडकावल्याने राज्याचे सहकारमंत्री सुभास देशमुख यांना ‘सेबी’ अर्थात सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने जोरदार दणका दिला आहे. मंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल’चे म्युच्युअल फंड आणि डी-मॅट खात्यांना सेबीकडून सील ठोकण्यात आले आहे. तसंच ७४ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी मंत्री सुभाष देशमुख यांना नोटीस सुद्धा धाडण्यात आली आहे.

लोकमंगल’मधील गुंतवणुकदारांचे ७४ कोटी रुपये तीन महिन्यात परत करण्याचे आदेश सेबीने १६ मे २०१८ रोजी दिले होते. परंतु, मागील ६ महिन्यांपासून लोकमंगलने सेबीच्या आदेशाला कोणतेही अधिकृत आणि कायदेशीर उत्तरच दिले नाही. त्यामुळे सेबीकडून ही नियमाअंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.

नक्की काय कारवाई केली?

  1. सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगलची खाती गोठवण्याचा सेबीची नोटीस
  2. लोकमंगलचे डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंडाची खाती गोठवण्याचे सेबीची नोटीस
  3. लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीबरोबरच, नोटीसमध्ये देशमुख यांच्या पत्नी स्मिता देशमुख, वैजनाथ लातूरे, औदुंबर देशमुख, शहाजी पवार, गुर्राना तेली, महेश देशमुख, पराग पाटील यांनाही नोटीस

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x