नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी ठराविक वस्तूंवरील जीएसटी घटवल्यानंतर आता आज पार पडलेल्या जीएसटी काऊन्सिलच्या दिल्लीतील बैठकीत उद्योजकांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेण्यात आले आहेत. यापुढे ज्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल ४० लाखापर्यंत असेल त्यांना जीएसटीमधून सूट देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी ती सूट २० लाख उलाढाल असलेल्या कंपन्यांना होती.

दरम्यान, कम्पोझिशन स्कीमअंतर्गत येणाऱ्या कंपन्यांसाठी मर्यादा सुद्धा केंद्राकडून शिथिल करण्यात आली असून ती आता दिड कोटी रुपये झाली आहे. त्यानुसार या स्कीममध्ये येणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक तिमाहीमध्ये कर भरावा लागणार आहे, परंतु, कर परतावा वर्षातून केवळ एकदाच भरावा लागणार आहे, असे सुद्धा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. आज दुपारी जीएसटी काऊन्सिलची बैठक आयोजित केली होती. यानंतर जेटली यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सदर निर्णयांची घोषणा केली.

Exemption limit for GST for those with a turnover up to 20 lakh has been increased to 40 lakhs