29 April 2024 8:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

5G Smartphones | नवीन 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय? | तगड्या फीचर्सच्या 3 स्वस्त फोनचं लॉन्चिंग होतंय

5G Smartphones

5G Smartphones | जून महिन्याचा हा आठवडा स्मार्टफोनप्रेमींसाठी खास आहे. रियलमीपासून ते सॅमसंग आणि पोकोपर्यंत विविध कंपन्यांचे स्मार्टफोन लाँच होणार आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही फोन वेगवेगळ्या किंमत सेगमेंटचे असतील. या तिन्ही फोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाणार आहे. जाणून घेऊयात या फोन्सची अधिक माहिती.

रियलमी सी 30 – Realme C30 :
रियलमी सी ३० २० जून रोजी भारतात फ्लिपकार्टवर लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन युनिसोक टी ६१२ प्रोसेसरवर चालणार असून यात ५० एमएएचची मोठी बॅटरी असणार आहे. डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर त्याची जाडी ८.५ मिमी आणि वजन १८२ ग्रॅम आहे. बॅक पॅनेलला व्हर्टिकल स्ट्राइप डिझाइन मिळते. मागील बाजूस फक्त एकच रियर कॅमेरा सेन्सर आहे, ज्याचा आकार बराच मोठा आहे. हा स्मार्टफोन 10 हजारांपेक्षा कमी रेंजमध्ये आणला जाऊ शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी एफ 13 – Samsung Galaxy F13 :
सॅमसंगचा हा स्मार्टफोन 22 जूनला लाँच होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गॅलेक्सी एफ १३ मध्ये ६० एमएएचएच बॅटरीसह फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले, १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. फोनमध्ये ऑटो डेटा स्विचिंग फीचर देखील आहे. फोटोंच्या आधारे हे स्पष्ट झाले आहे की, हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येणार आहे. याची किंमत साधारण 20 हजार रुपयांपासून सुरू होऊ शकते.

पोको एफ 4 5जी – POCO F4 5G
पोको एफ 4 5 जी स्मार्टफोनचे जागतिक पदार्पण 23 जून रोजी संध्याकाळी 5:30 वाजता होणार आहे. स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसरवर हा फोन चालणार असून यात ई ४ सुपर एमोलेड डिस्प्ले मिळणार आहे. फोनमध्ये लिक्विडकूल 2.0 देखील आहे, ज्यामुळे उष्णता कमी होते. फोनमध्ये १३०० निट्स पीक ब्राइटनेस, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि ३६० हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 5G Smartphones launching this week check details 19 June 2022.

हॅशटॅग्स

#5G Smartphones(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x