6 May 2024 10:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर
x

Shivsena Hijacked | एकनाथ शिंदे बाळासाहेबांची सेना भाजपच्या मदतीने ताब्यात घेणार? | उद्धव ठाकरेचं नेतृत्व संकटात

Shivsena Hijacked

Shivsena Hijacked | शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आधी सुरत तर आता गुवाहाटीमध्ये मुक्काम ठोकला आहे. सुरतवरून गुवाहाटीला जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी बंडामागची भूमिका स्पष्ट केली.

४० आमदार सोबत :
४० आमदारांना सोबत घेऊन आधी सुरतला गेलेले एकनाथ शिंदे मध्यरात्री सुरत सोडलं आणि सकाळी गुवाहाटीला पोहोचले. गुवाहाटीला जात असताना एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

आम्ही शिवसेनेतच राहणार :
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मी शिवसेना सोडणार नाहीये. मी बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि त्यांचा विचार पुढे घेऊन जात आहे. आम्ही कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही. आम्ही कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. आम्ही शिवसेनेतच राहणार, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा विचार पुढे घेऊन जात आहोत.

सेनेकडे फक्त १७ आमदार :
आधीच शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची निवड केली आहे. पण सेनेकडे फक्त १७ आमदार असल्याचे पत्र दिले होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे दावा करू शकतात. त्यांच्या दाव्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेचं नेतृत्व संकटात :
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर करण्यासाठी शिवसेनेसमोर एकनाथ शिंदे यांचं बंड शमविण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार असून, कोणत्या तोडग्यानंतर बंड शमणार की शिंदे सेनेला सोडचिठ्ठी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Hijacked by Eknath Shinde political stand check details 22 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x