27 April 2024 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

शिंदेंनी आमदारांना माहिती देतानाही भाजपची स्क्रिप्ट वाचली? | भाजप ही महासत्ता आहे... त्यांनी पाकिस्तानची तर..

Eknath Shinde | बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यात ते असं काही म्हणत आहेत, ज्यामुळे एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब होत आहे. यात ते आमदारांशी संवाद साधताना दिसत आहेत. याशिवाय एका आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असल्याचंही सांगितलं आहे.

भाजपच्या स्तुतीचा पाढा आणि तोही भाजपने लिहून दिल्यासारखा वाटतो :

काय म्हटलंय एकनाथ शिंदे यांनी :
आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांना देत असल्याचं समर्थक आमदार सांगतायत. त्यानंतर सर्व आमदारांनी हात वर करुन त्याला समर्थन दिलं.

जे काय सुख-दु:ख आहे ते आपल्या सर्वांचं आहे, काही असेल तर आपण एकजुटीने कितीही काही होऊ द्या विजय आपलाच आहे असं एकनाथ शिंदे सांगताना दिसत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत जाण्याची त्यांची भूमिका पहिल्यांदाच या व्हिडीओच्या माध्यमातून बाहेर आली आहे. यात भाजपा ही महासत्ता असल्याचे सांगत, त्यांनी आपल्याला या बंडात काहीही कमी पडणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे परत शिवसेनेत येतील, ही आशा संपलेली दिसते आहे. संजय राऊत यांनी या आमदारांनी २४ तासांत परत यावे, त्यांनी दिलेल्या पर्यायावर विचार करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून शिंदे यांनी त्यांची पुढची वाटचाल स्पष्ट करुन टाकली आहे.

शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात जावून सहभागी झाले आहेत. हे सर्व आमदार आसामच्या गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आधी सुरतमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना एअर लिफ्टिंग करुन गुवाहाटीला नेलं गेलं. शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांना भाजपचा पडद्यामागून पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde in Guwahati for anti Shivsena politics check details 23 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x