13 December 2024 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

शेतकऱ्यांनी MSP वरून मोठ्या लढ्याची तयारी ठेवावी, मोदींचे मित्र अदानी यांच्यामुळे MSP'ची अंमलबजावणी होत नाही - राज्यपाल सत्यपाल मलिक

Meghalaya Governor Satya Pal Malik

Meghalaya Governor Satya Pal Malik | मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढवला आहे. “देशात किमान आधारभूत किंमत (एमएसपी) लागू केली जात नाही कारण पंतप्रधानांचा अदानी नावाचा एक मित्र आहे, जो गेल्या पाच वर्षांत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे, “मलिक यांनी द इंडियन एक्सप्रेसला याबाबत सांगितले. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर जबरदस्त लढ्याची तयारी ठेवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

जर किमान आधारभूत किंमत लागू केली गेली नाही आणि एमएसपीची हमी दिली गेली नाही, तर आणखी एक लढाई होईल आणि यावेळी ही लढाई जबरदस्त असेल. तुम्ही या देशातील शेतकऱ्याला हरवू शकत नाही. तुम्ही त्याला घाबरवू शकत नाहीस… ईडी किंवा आयकर अधिकारी पाठवू शकत नाही, त्यामुळे शेतकऱ्याला घाबरवणार तरी कसं?

“एमएसपीची अंमलबजावणी केली जात नाही कारण पंतप्रधानांचा अदानी नावाचा एक मित्र आहे, जो केवळ पाच वर्षांत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे,” मलिक यांनी याच कार्यक्रमादरम्यान थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. उद्योगपतीने पानिपतमध्ये एक मोठे गोदाम बांधले आहे, जिथे स्वस्त दरात खरेदी केलेला गहू साठवला गेला आहे, असा दावाही त्यांनी केला. “जेव्हा किंमती वाढतील, तेव्हा तो तो गहू विकेल… त्यामुळे अशा प्रकारे पंतप्रधानांचे मित्र नफा कमावतील आणि शेतकरी उद्ध्वस्त होतील. हे सहन केले जाणार नाही आणि त्याविरोधात तीव्र संघर्षही केला जाईल.

त्यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेचा संदर्भ देत राज्यपाल मलिक म्हणाले, “गुवाहाटी विमानतळावर मला एक महिला फुलांचा गुच्छ घेऊन जाताना दिसली. मी तिला विचारले की ती कुठून आली आहे, तेव्हा ती म्हणाली, “आम्ही अदानीहून आलो आहोत. मी विचारलं, याचा अर्थ काय? तर ते म्हणाले, हा विमानतळ आता अदानींकडे सोपवण्यात आला आहे.. सर्व विमानतळ, बंदरे, प्रमुख योजना आता अदानींकडे सुपूर्द केल्या जात आहेत… आणि एकप्रकारे देश विकण्याची तयारीच असते. राज्यपालपदाचा सध्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्यात पूर्णपणे सहभागी होणार असल्याचंही मलिक यांनी सांगितलं.

यापूर्वी मेघालयचे राज्यपाल मलिक यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकार आणि पंतप्रधानांवर टीका केली होती. याच वर्षी जानेवारी महिन्यात शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असता त्यांची वृत्ती अहंकाराने भरलेली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. “आंदोलनादरम्यान 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, पण कोणताही शोकसंदेश पाठवण्यात आला नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Meghalaya Governor Satya Pal Malik Attacks PM Modi over MSP implementation check details 23 August 2022.

हॅशटॅग्स

#Satya Pal Malik(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x