1 May 2024 4:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

मतांसाठी वाट्टेल ते? प्रभू राम हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय: पूनम महाजन

मुंबई: उत्तर भारतीय समाज म्हणजे मुंबईचा कणा असल्याचं भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांनी एका कार्यक्रमात विधान केला आहे. युपीच्या लोकांनी पुढे जाण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. तसेच या समाजानं मुंबईच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्याही विकासात मोलाचं आणि भरीव योगदान दिलं आहे, असं सुद्धा त्या उपस्थित उत्तर भारतीयांना संबोधित करताना म्हणाल्या. मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात आयोजित एका कार्यक्रमात भाषणादरम्यान त्यांनी हे भाष्य केलं.

भारतीय जनता पक्षाच्या उत्तर भारतीय मोर्चाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या कार्यक्रमात उत्तर भारतीय समाजातील काही व्यक्तींचा विशेष सत्कार सुद्धा खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पूनम महाजन यांनी उत्तर भारतीय समाजाचं तोंडभरुन आणि जाहीर कौतुक केलं. त्यात उपस्थितांना खुश करण्यासाठी त्यांनी एक थेट प्रभू राम यांनाच परप्रांतीयांच्या पंगतीत जाऊन बसवलं. त्या म्हणाल्या महाराष्ट्र आणि उत्तर भारताचं नातं खूप जुनं आहे. कारण, महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय हे प्रभू राम होते, असं त्या जाहीर पाने म्हणाल्या.

उत्तर भारत आणि महाराष्ट्राचा संबंध अगदी प्राचीन काळापासून राहिले आहेत. तसेच यूपीचा समाज तुम्हाला केवळ मुंबईत शहरात नव्हे, तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. महाराष्ट्राच्या प्रगतीत या समाजाचं मोठं योगदान आहे, असे कौतुकोद्गार महाजन यांनी काढले या वेळी काढले. दरम्यान या कार्यक्रमाला स्थानिक आमदार प्रकाश अळवणी, माजी नगरसेवक महेश पारकर, नितेश राजहंस सिंह, गुलाबचंद दुबे आणि भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x