29 April 2024 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करा | राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना आदेश जारी | आता पुढे काय?

Eknath Shinde

Devendra Fadnavis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत मोठी बातमी आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकार यांनी बहुमत गमावले, असे मानले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (गुरुवारी) बहुमत सिद्ध करा, असे निर्देश राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला दिले आहेत. त्यामुळे गुरुवारचा दिवस ठाकरे सरकारसाठी निर्णायक ठरणार आहे.

मंगळवारी राज्यपालांची भेट :
देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. महाविकासघडी सरकार अल्पमतात असून बहुमत चाचणी लवकरात लवकर घेण्यात यावी, अशी मागणी भाजपने या बैठकीत केली. त्यानंतर राज्यपालांनी एक पत्र लिहिलं आहे. राज्यपालांच्या या पत्रानंतर आता उद्धव ठाकरे सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

एकनाथ शिंदे उद्या मुंबईला पोहोचणार :
दरम्यान, एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत येणार असून, बहुमत चाचणीसाठी येणार असल्याची शिंदेंनी माहिती दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला उद्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागेल. राज्यापालांची एक प्रत राज्यपालांकडे देण्यात आली आहे. 30 जूनला बहुमत सिद्ध होणार आहे. राज्यपालांचे बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गुवाहाटी येथे बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्या मुंबईला पोहोचणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता उद्याच बहुमत चाचणीला महाविकास आघाडी सरकराला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन बोललं जाईल आणि त्यानंतर आता उद्याच बहुमत चाचणी होणार असल्याचं स्पष्ट झालंय. गुवाहाटीच कामाक्षी देवीच्या मंदिरासाठी गेले असता ते माध्यमांशी बोलत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra governor has sent letter to CM Uddhav Thackeray floor test 29 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x