4 May 2024 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्वाचे निर्णय

मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयाने शिवसेनेला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पुणेकरांना सुद्धा विशेष शैक्षणिक भेट दिली आहे. कारण आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय निश्चित करण्यात आले.

त्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबई महापौर निवासाची जागा निश्चित करण्यात आली, तसेच महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेत वर्ग करण्यात आला आहे. तसेच स्मारकाच्या कामासाठी एकूण शंभर कोटींचा निधी एमएमआरडीएमार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आजची कॅबिनेट बैठक शिवसेनेला खुश करण्यासाठी होती का असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेला फर्ग्युसन युनिव्हर्सिटी म्हणून मान्यता देण्याचा निर्णय सुद्धा कॅबिनेटने घेतला आहे आणि सदर निर्णय शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवू शकतो असं म्हटलं जात आहे.

आजचे राज्य मंत्रिमंडळाचे कॅबिनेटमधील महत्वाचे निर्णय

  1. दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय.
  2. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी १०० कोटींचा निधी एमएमआरडीएमार्फत उपलब्ध करण्यास मंजुरी.
  3. मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन पुरस्कृत महिला सुरक्षितता पुढाकार योजना राबविण्यास मान्यता.
  4. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेचे रुपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यास मान्यता.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x