17 May 2024 7:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Post Office Investment | पोस्ट ऑफिसने आणली स्किम ज्यात 50 रूपये जमा करा आणि 35 लाख रुपये परतावा मिळवा

Post Office Investment

Post Office Investment | ग्राम सुरक्षा योजना ही भारतीय पोस्टची एक जबरदस्त योजना आहे. या योजनेत जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला डोळे दिपवणारा परतावा मिळेल ह्यात काही शंका नाही. याबाबत अधिक जाणून घेऊया. आपण बऱ्याच ठिकाणी सुरक्षित गुंतवणूक करण्याची संधी शोधत असतो आणि चांगला परतावा मिळवणे हा आपला उद्देश असतो. बऱ्याच वेळा चुकीची गुंतवणूक करून पैसे गमवण्याचा धोका असतो.

एक सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर :
जर आपल्याला एक सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर भारतीय पोस्ट आपल्यासाठी घेउन आपली आहे ग्राम सुरक्षा योजना. या योजनेमध्ये पैसे गुंतवणुकी संबंधित काही धोका किंवा जोखीम राहत नाही. ही भारतीय पोस्टची एक जबरदस्त योजना आहे. या योजनेमुळे तुम्हला एका सुरक्षित योजनेत पैसे गुंतवण्याची संधी तर मिळेच सोबत तुम्हाला जबरदस्त परतावा मिळेल. या योजनेत तुम्हाला फक्त दररोज ५० रुपये जमा करायचे आहेत आणि ह्यात सातत्य राहिल्यास एका ठराविक मुदतीनंतर तुम्हाला ३५ लाख रुपये परतावा मिळेल. हो हे खरे आहे. चला आणखी माहिती जाणून घेऊया.

प्रत्येकामध्ये जोखीम घेण्याची क्षमता नसते :
आंतरराष्ट्रीय अस्थिरता, जागतिक मंदिकडे होत असलेली वाटचाल आणि प्रचंड महागाई ह्या सर्व समस्यांना जग आणि लोकं सामोरे जात आहेत. गुंतवणूक करताना लोक घाबरतात, धोका असतो, पैसे बुडतील, त्यातील जोखीम अशी भीती प्रत्येकाच्या मनात असते. प्रत्येकामध्ये जोखीम घेण्याची क्षमता नसते. अशा परिस्थितीत तुम्ही अशी एक पैसे गुंतवणूक करण्यासाठी संधी शोधत असतो जिथे गुंतवणूक करून तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला शून्य जोखमीसह चांगला परतावा मिळेल. तुम्हालाही अशी गुंतवणूक हवी असेल, जिथे चांगला नफाही मिळत असेल, तर भारतीय पोस्टची ग्राम सुरक्षा योजना ही योजना तुमच्यासाठी चांगली आहे.

परतावा ३५ लाख रुपये:
भारतीय पोस्टच्या बऱ्याच छोट्या बचत योजना आहेत ज्या तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. यामध्ये रिस्क फॅक्टर म्हणजे जोखीमही कमी आहे आणि त्याचवेळी रिटर्नही (परतावा) चांगला मिळतो. पोस्ट ऑफिसची ‘ग्राम सुरक्षा योजना’ गुंतवणुकीसाठी एक चांगली संधी आहे. कमी जोखमीसह चांगला परतावा मिळवून देणारी अशी ही एक योजना आहे. या योजनेत तुम्हाला दरमहा १५०० रुपये जमा करावे लागतील, म्हणजेच दररोज ५० रुपये. ही रक्कम नियमितपणे जमा केल्यास भविष्यात तुम्हाला ३१ ते ३५ लाखांचा फायदा होईल.

गुंतवणूक करण्याचे काही नियम जाणून घ्या:
*
भारतीय नागरिक असावा, वय १९ ते ५५ वर्षे वयोगटातील कोणताही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
* या योजनेअंतर्गत किमान विमा लाभ रक्कम १०००० ते १० लाख रुपयांपर्यंत असू शकते.
* या योजनेचे प्रीमियम देय मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक भरू शकता.
* मासिक हफ्ता भरण्यासाठी तुम्हाला ३० दिवसांची सूट मिळते.
* या योजनेवर तुम्ही कर्जही घेण्यासही पात्र आहात.
* ही योजना घेतल्यानंतर ३ वर्षांनी तुम्ही ते सरेंडरही करु शकता. परंतु या स्थितीत तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही.

तुम्हाला असा फायदा होईल:
समजा, तुम्ही वयाच्या १९ व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करायला सुरवात केली, तर त्याचा ५५ वर्षांसाठीचा मासिक हप्ता १५१५ रुपये, ५८ वर्षांसाठी १४६३ रुपये आणि ६० वर्षांसाठी १४११ रुपये असेल. अशा परिस्थितीत, या योजनेच्या लाभार्थीला ५५ वर्षांसाठी ३१.६० लाख रुपये, ५८ वर्षांसाठी ३३.४० लाख रुपये आणि ६० वर्षांसाठी ३४.६० लाख रुपये मॅच्युरिटी परतावा मिळेल.

News Title: Post Office Investment Gram Suraksha Yojna check details on 18 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x