4 May 2024 6:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

पूर्वानुभव; 'तो' IT सेल वेगळंच पसरवेल म्हणून प्रियांकाचा धर्म व शिक्षण तुमच्या माहितीसाठी

नवी दिल्ली : कालच प्रियंका गांधींची निवड अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदावर झाली आणि देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या विषयावरून अगदी नरेंद्र मोदी सुद्धा काही मिनिटातच प्रियांका गांधी यांचं नाव न घेता व्यक्त झाले. विशेष करून त्यांना थेट सरचिटणीस पद बहाल करून उत्तर प्रदेशाच्या प्रभारी म्हणून ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यासोबत जवाबदारी वाटून देण्यात आली आहे. दरम्यान, या राजकीय घटनेनंतर प्रियंका गांधी या दिवसभर ट्विटरवरील १० प्रमुख ट्रेंड्स पैकी तब्बल ९ ट्रेंड्स हे प्रियंका गांधींशी थेट संबंधित होते. त्यावरून त्यांच्या थेट सक्रिय राजकारणातील प्रवेशाचा अर्थ काढता येतो.

परंतु, भाजप नेत्यांचा आणि भाजपच्या समर्थकांचा जळपाळाट सुद्धा समाज माध्यमांवर ठळकपणे दिसत आहे. परंतु, विरोधकांच्या आयटी सेलचा पूर्वानुभव पाहता आणि त्यांच्या डर्टी ट्रिकचा इतिहास पाहता लवकरच समाज माध्यमांवर ट्रोल्स त्यांच्या गौरवशाली परंपरेनुसार मॉर्फिंग आणि फोटोशॉपचा पुरेपूर वापर करून प्रियांका गांधी यांच्याबद्दल काही न काही खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाही.

त्यासाठीच आम्ही तुम्हाला प्रियंका गांधींबद्दलची विशिष्ट माहिती आधीच देत आहोत. यामागील प्रामाणिक उद्देश हाच की खोट्या गोष्टीचा प्रसार रोखणे आणि लोकशाही मार्गाने विषय मांडणे इतकाच आहे. तसेच भारतातलं राजकारण २०१४ सर्वांगीण विकास आणि प्रगतीचा राजमार्ग सोडून विकृतीच्या दिशेने गेले आहे. त्यामुळे धर्म आणि जातीच्या नावाने तरुणांपर्यंत चुकीची माहिती पोहोचविण्यात येते आहे.

प्रियंका गांधी या ससुद्धा उच्चशिक्षित आहेत, परंतु त्यांच्या आजींची आणि वडिलांच्या हत्येनंतर केवळ सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना आपलं प्राथमिक शिक्षण घरातच पूर्ण करावं लागलं होतं. परंतु, त्यानंतर त्यांनी ‘कॉन्व्हेंट ऑफ जीजस अँड मेरी’ मधून आपलं पुढील शिक्षण पूर्ण केलं. तसेच प्रियंका गांधींना मानसशास्त्राची विशेष आवड असल्याने त्यांनी दिल्ली पुढे विद्यापीठाच्या जीजस अँड मेरी कॉलेजमधून मानसशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी बुद्धिस्त तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास करण्यात अनेक वर्षे व्यतीत केली आणि बुद्धिस्ट फिलॉसॉफी या विषयात त्यांनी एम.ए. पूर्ण केलं असा त्यांचा शिक्षणाचा एकूण प्रवास राहिला आहे.

प्रियंका गांधींचे पती रोबर्ट वडेरा हे धर्माने पंजाबी-हिंदू आहेत, तर त्यांच्या आई या सोनिया गांधी ह्या जन्माने ख्रिस्ती होत्या तर वडील राजीव गांधी हे हिंदू (कारण फिरोज गांधींनी हिंदू धर्म स्वीकारून इंदिरा गांधींशी लग्न केल्याने) होते. परंतु, असं असलं तरी प्रियंका गांधींचा धर्म मात्र वेगळाच आहे, बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करताना त्या इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे उल्लेख बऱ्याच ठिकाणी करण्यात आला. तसा उल्लेख आम्हाला इंटरनेट’वर बऱ्याच ठिकाणी आढळला. परंतु, प्रियंका गांधींनी अजून लोकसभा निवडणुकीत भाग घेतला नसल्याने त्यांचं शपथपत्र आम्हाला मिळलेलं नाही. दरम्यान, याआधी त्यांनी त्यांच्या रोजच्या जीवनात विपश्यनेचा मोठा सहभाग असल्याचं याआधी अनेकदा सांगितलं आहे, त्या विपश्यनेचे प्रसारक सत्य नारायण गोयंका यांच्या विचारसरणीने प्रभावित आहेत, अशी सुद्धा माहिती आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x