21 May 2024 8:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Investment Tips | गुंतवणुकीचे पैसे तिप्पट होण्याची हमी | ही आहे तुमच्यासाठी सर्वात फायदेशीर सरकारी योजना

Sukanya Samriddhi Yojana

Investment Tips | भांडवल बाजार ज्या प्रकारे वर-खाली होत आहे, त्यामुळे लोक पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय शोधत आहेत. सुरक्षित गुंतवणुकीत अल्पबचत योजनाही आहेत. मात्र, या योजनांमधील व्याजदर कमी असल्याने पूर्वीसारखे आकर्षण राहिलेले नाही. पण यामध्ये पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) हा एक चांगला पर्याय आहे.

सर्वाधिक व्याज देणारी अल्पबचत योजना :
अल्पबचत योजनेतील ही सर्वाधिक व्याज देणारी योजना आहे. ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देते आणि मुलींच्या नावाने सुरू असलेल्या या योजनेत तुमचे पैसे 3 पट वाढवण्याची हमी आहे. पीएसवायला पीपीएफ, एफडी, एनएससी, आरडी, मंथली इन्कम स्कीम किंवा टाइम डिपॉजिटपेक्षा चांगले व्याज मिळत आहे.

योजनेतील व्याजदर :
सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजदर वार्षिक ७.६ टक्के आहे. विशेष म्हणजे या योजनेची मॅच्युरिटी २१ वर्षांची आहे, पण त्यात पालकांना फक्त १४ वर्षेच गुंतवणूक करावी लागते. उर्वरित वर्षभर व्याजाची भर पडत राहते. या प्लानमध्ये जितकी गुंतवणूक कराल तितका मॅच्युरिटीवर मिळणारा परतावा ३ पट असेल. सध्याच्या व्याजदरानुसार जास्तीत जास्त ६४ लाख रुपयांपर्यंतची रक्कम या योजनेच्या माध्यमातून उभी करता येईल.

मॅच्युरिटीवर 3 पट होतील पैसे :
* सध्या सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर 7.6 टक्के निश्चित करण्यात आले आहेत.
* या योजनेत वर्षाला जास्तीत जास्त १.५० लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. जे मासिक 12500 रुपये असेल.
* जर हे व्याजदर अबाधित राहिले आणि १४ वर्षे तुम्ही दरमहा अतिरिक्त १२,५०० किंवा १.५० लाख रुपये वार्षिक गुंतवता.
* १४ वर्षांसाठी वार्षिक १.५० लाख गुंतवणूकीवर आपल्या कडून एकूण योगदान २१ लाख रुपये असेल.
* १४ वर्षांत वार्षिक ७.६ टक्के कम्पाउंडिंग केल्यास ही रक्कम ३७,९८,२२५ रुपये असेल.
* यानंतर 7 वर्षांसाठी या रकमेवर वार्षिक 7.6 टक्के कंपाउंडिंगचा परतावा मिळणार आहे.
* 21 वर्षांच्या मॅच्युरिटीवर ही रक्कम जवळपास 63,42,589 रुपये असेल.

हे खाते उघडण्यासाठी काय करावे :
* सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म घ्यावा लागतो.
* त्यासाठी मुलीच्या जन्माचा दाखला प्रमाणित करणे आवश्यक आहे. मुलीचे वय १० वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
* पालकांचा आयडी प्रूफही लागणार . पॅनकार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट अशी कोणतीही कागदपत्रे लावता येतात.
* पालकांना पत्त्याच्या पुराव्यासाठी कागदपत्रेही सादर करावी लागतील. तसेच वैध ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, वीज बिल किंवा रेशनकार्डही आहे.
* बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तुमचं खातं उघडलं जाईल.
* खाते उघडल्यानंतर खातेदाराला पासबुकही दिले जाते.
* 2 पेक्षा जास्त मुलांचे खाते उघडायचे असेल तर जन्मदाखल्यासह प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक राहील.

काय आहेत या योजनेचे फायदे :
सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीचा लाभ प्राप्तिकर कायद्याच्या कलम ‘८० सी’खाली करसवलतीचा लाभ घेता येईल. मुलगी 18 वर्षांची झाली आणि तिला अभ्यासासाठी किंवा लग्नासाठी पैशांची गरज असेल तर तुम्ही डिपॉझिटच्या रकमेच्या 50 टक्के रक्कम काढू शकता. या योजनेत वार्षिक किमान २५० रुपये जमा करता येतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Investment Tips on Sukanya Samriddhi Yojana check benefits here 22 July 2022.

हॅशटॅग्स

#Investment Tips(142)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x