3 May 2024 5:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

२०२४ पूर्वी देशातील विरोधी पक्षांना हुकूमशाहीतून नष्ट करायची योजना? | राऊत खोटं बोलत आहेत असं वाटतंय तर हा व्हिडिओ पहा

Journalist Deepak Sharma

MP Sanjay Raut | शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील रोखठोकमध्ये म्हटले आहे की, भारतामधील लोकशाहीचे भवितव्य कसे अंधकारमय झाले आहे त्यांचे प्रत्यंतर रोजच येत आहे. देशाचे सरन्यायाधीश श्री. रमण्णा यांनी देखील एका कार्यक्रमात लोकशाही आणि संसदेच्या भवितव्यावर चिंता व्यक्त केली आहे.विरोधी पक्षांची जागाही सत्ताध्याऱ्यांनी बळकावयाची हे चित्र घातक आहे, असे सरन्यायाधीश रमण्णा जेव्हा जाहीरपणे सांगतात तेव्हा भीती वाटू लागते. पण एकाधिकारशाही व हुकूमशाहीचे कितीही तांडव झाले तरी लोकशाही या देशात मरणार नसल्याचे रोखठोकमध्ये म्हटले आहे.

यांची सरकारे भविष्यात याच पद्धतीने भरडली जातील :
‘महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाने लोकशाहीची मूल्ये उद्ध्वस्त केली हे केंद्रातील राज्यकर्ते मानायला तयार नाहीत. आमदारांना फोडले व खासदारही फुटले. उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांच्या विरोधात जाऊन सरकार स्थापन केले. त्याचा बदला शेवटी शिवसेनेत फूट पाडून घेण्यात आला. तेलंगणाचे के. सी. चंद्रशेखर राव व झारखंडचे हेमंत सोरेन यांची सरकारे भविष्यात याच पद्धतीने भरडली जातील. सोरेन यांच्या निकटवर्तीयांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडू लागल्याची टीकाही रोखठोकमधून करण्यात आली आहे.

न्यायाचे तत्त्व चुकीच्या पद्धतीने राबवले जात आहे :
ज्या बंडखोर शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यावर केंद्रीय यंत्रणांचे खटले होते, अशा सर्वांना जाचातून मुक्त करण्यात आले आहे, त्यांना आता शांत झोप लागेल. इथे समान न्यायाचे तत्त्व चुकीच्या पद्धतीने राबवले जात आहे.भारतीय लोकशाही जिवंत आहे, पण ती कुणाची तरी आज बटीक असल्याची टीकाही रोखठोकमधून करण्यात आली आहे.

ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरातून :
दरम्यान, देशातील ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरातून या देशातील सर विरोधी पक्ष संपविण्याचा घाट घातला गेल्याचा आरोप होतं असताना आता वरिष्ठ पत्रकार दीपक शर्मा यांनी यावर सविस्तर वृत्त दिलं आहे. त्यातून देशातील विरोधकांना नष्ट करून सामान्य लोकांचा आवाजच दाबून टाकण्याची योजना आखली जातं आहे यावर सविस्तर विश्लेषण करण्यात आलं आहे. सध्या दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया, तेलंगणाचे के. सी. चंद्रशेखर राव व झारखंडचे हेमंत सोरेन यांची सरकारे पाडण्याच्या हालचाली सुरु झाल्याचं ईडीच्या कारवायांतून समोर येतंय. त्यालाच दुजोरा देणारं हे वृत्त पहा.

काय म्हटलंय या सविस्तर विश्लेषणात :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Modi Shah strategy against nationwide oppositions parties explained by journalist Deepak Sharma check details 24 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x