
Radhakishan Damani Portfolio | प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि उद्योजक राधाकिशन दमानी यांनी जून 2022 च्या तिमाहीत युनायटेड ब्रुअरीज कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. दमानी यांनी या मद्य कंपनीचे तब्बल 56,544 शेअर्स खरेदी केले आहेत. म्हणजेच कंपनीतील तब्बल 0.02 टक्के वाटा खरेदी केला आहे. दमानी यांच्याकडे आता युनायटेड ब्रुअरीज कंपनीचे एकूण 32,52,378 शेअर्स आहेत आणि त्यांच्या गुंतवणुकीचा एकूण वाटा 1.23% एवढा आहे.
डी-मार्टचे मालक राधाकिशन दमानी :
दिग्गज गुंतवणूकदार आणि रिटेल चेन ब्रँड डी-मार्टचे मालक राधाकिशन दमानी यांनी एका मद्य कंपनीत आपला हिस्सा वाढवला आहे. ही कंपनी युनायटेड ब्रुअरीज लिमिटेड आहे जी मद्य निर्मितीच्या उद्योगात दिग्गज कंपनी म्हणून ओळखली जाते. जून 2022 च्या तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, दमानी यांनी कंपनीतील त्यांचा हिस्सा मोठ्या प्रमाणत वाढवला आहे. राधाकिशन दमानी यांनी युनायटेड ब्रुअरीजचे 50,000 हून अधिक शेअर्स खरेदी करून त्यात आपली गुंतवणूक वाढवली आहे. त्यांनी हे शेअर्स त्यांच्या डेरिव्ह ट्रेडिंग अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून खरेदी केले आहेत.
युनायटेड ब्रेवरीजचे 56,544 शेअर्स खरेदी :
राधाकिशन दमानी यांनी जून 2022 च्या तिमाहीत युनायटेड ब्रेवरीज कंपनीचे 56,544 शेअर्स म्हणजेच एकूण 0.02% स्टॉक खरेदी केले आहेत. राधाकिशन दमानी यांच्याकडे आता युनायटेड ब्रुअरीजमध्ये 32,52,378 शेअर्स आहेत. आणि त्यांच्या कडे एकूण कंपनीचा 1.23% वाटा आहे. मार्च 2022 च्या तिमाहीत दमानी यांच्या ट्रेडिंग कंपनीकडे युनायटेड ब्रुअरीजचे 3195834 शेअर्स होते, त्यानंतर त्यांनी आणखी 50000 पेक्षा जास्त शेअर्स खरेदी केले आहेत. 28 जुलै 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज वर युनायटेड ब्रुअरीजचे शेअर्स रु. 1641.95 रुपये वर ट्रेड करत होते.
दमानी यांचा पोर्टफोलिओ :
सध्या दमानीच्या पोर्टफोलिओमध्ये लहान मोठे असे एकूण 14 स्टॉक्स आहेत, ज्यात त्यांनी गुंतवणूक केली आहे. अव्हेन्यू सुपरमार्ट्स ही रिटेल चेन ब्रँड डी-मार्टची मूळ कंपनी आहे जी दमानी यांच्या मालकीची आहे. व्हीएसटी इंडस्ट्रीज आणि इंडिया सिमेंट्स हे त्याच्या पोर्टफोलिओ यादीतील सर्वात जास्त गुंतवणूक केलेले स्टॉक आहेत. युनायटेड ब्रुअरीजचे शेअर्समध्ये मागील एका महिन्यात 12 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 28 जून 2022 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर युनायटेड ब्रुअरीज कंपनीचे शेअर्स 1461.45 रुपये वर ट्रेड करत होते. 28 जुलै 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 1640.85 रुपयांच्या पातळीवर जाऊन पोहोचले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.