7 May 2024 2:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

प्रियांका गांधी मौनी अमावस्या किंवा वसंत पंचमीला कुंभमेळात, भाजपची झोप उडण्याची शक्यता

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुक हिंदुत्वाचा अजेंडा पुढे करून लढणार यात अजिबात शंका नाही. त्यामुळे त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी यांनी कुंभमेळादरम्यान त्रिवेणी संगमात स्नान करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रसार माध्यमांच्या हाती आलेल्या वृत्तानुसार राहुल गांधी व प्रियंका गांधी हे दोघेही मौनी अमावस्या किंवा वसंत पंचमीला कुंभमेळात स्नान करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे देशभरात काँग्रेस पक्ष हा केवळ एखाद्या अमुक धर्माचा आहे, या विरोधकांच्या अपप्रचाराची हवाच काढून टाकण्याची खेळी काँग्रेसने केली आहे. दरम्यान, गांधी कुटुंबातील सदस्य कुंभमेळात स्नान करण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वी २००१ मध्ये तत्कालीन काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुद्धा कुंभमेळात स्नान केले होते, तसेच त्यावेळी अनेक मठांना भेटी देऊन साधू संतांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.

प्रियंका गांधी यांच्यासाठी विशेष रणनीती आखली जात असून, काँग्रेस पक्षाकडून कार्यक्रम निश्चित करणारी समिती निवडणुकीच्या प्रचार सभांची निवड सुद्धा त्याच पद्धतीने करणार आहे. लवकरच प्रियंका गांधी भारतात दाखल होतील आणि त्यांच्या सहमतीने कार्यक्रम जाहीर करता येईल अशी वरिष्ठ नेत्यांची योजना आहे. प्रियांका गांधी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात प्रयागराज’पासून करणार असल्याने भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x