29 March 2024 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं पहाटे निधन

Congress MP Ahmed Patel, passes away

नवी दिल्ली, २५ नोव्हेंबर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.

काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त गरज असताना अहमद पटेल यांची एक्झिट चटका लावणारी आहे. अहमद पटेल हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे निकटवर्तीय होते. काँग्रेसच्या प्रत्येक संकटात त्यांनी संकटमोचकाची भूमिका निभावली आणि प्रत्येक संकटातून काँग्रेसला मार्ग दाखवला. असाच किस्सा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होतानाही घडला होता.

राजकीय कारकिर्दीची सुरुवात:
अहमद पटेल यांचा जन्म गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वरमध्ये झाला. १९७७ मध्ये त्यांनी आपली पहिली लोकसभा निवडणूक लढली आणि जवळपास ६२ हजार मतांनी ते विजयी झाले. १९८० मध्ये त्यांनी ८२ हजार मतांनी विजय मिळवला. तर १९८४ च्या निवडणुकीत त्यांचा तब्बल १ लाख २३ हजार मतांनी विजय झाला. पुढे १९९३ पासून अहमद पटेल राज्यसभेचे खासदार राहिले होते.

गुजरात युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड:
१९७७ ते १९८२ दरम्यान पटेल यांनी गुजरात युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. तर १९८३ ते १९८४ असं एक वर्ष त्यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं जॉईंट सेक्रेटरी पद सांभाळलं. पुढे १९८५ मध्ये जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान पटेल माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव राहिले. जानेवारी १९८६ मध्ये त्यांच्यावर गुजरात काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. १९९१ मध्ये नरसिंह राव पंतप्रधान झाल्यानंतर पटेल यांना काँग्रेस वर्किंग कमिटीचा सदस्य बनवण्यात आलं.

१९९६ मध्ये त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं कोषाध्यक्ष बनवण्यात आलं होतं. पण काही कारणांमुळे त्यांनी ते पद सोडलं. पुढे २००० साली सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून पटेल यांनी कारकिर्द गाजवली. संघटनेसोबतच पटेल यांनी नागरी उड्डाण मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे बनवण्यात आलेल्या कमिटीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

 

News English Summary: Ahmed Patel, a senior Congress leader and Sonia Gandhi’s political adviser, passed away early Wednesday. He was 71 years old. Ahmed Patel was infected with corona a month ago. He was later admitted to Medanta Hospital in Gurugram. He succumbed to his injuries on Wednesday morning while undergoing treatment. Congress is mourning Patel’s departure.

News English Title: Veteran congress leader Ahmed Patel passes away News updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x