
Focused Equity Mutual Fund | देशातील महागाईचा दर सतत वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआय सतत प्रयत्न करत असते. अशा परिस्थितीत बँकेतील मुदत ठेवी किंवा अन्य कोणत्याही अल्पबचत योजनेवरील व्याजदर कमी होत आहे. अशा परिस्थितीत लोक चांगला नफा मिळवण्यासाठी गुंतवणुकीचे इतर पर्याय शोधत आहेत.चांगला परतावा मिळवण्यासाठी तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे.
फोकस्ड इक्विटी म्युच्युअल फंडाबद्दल जाणून घेऊ :
आज आम्ही तुम्हाला फोकस्ड इक्विटी म्युच्युअल फंडाबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता. खरे तर, फोकस्ड इक्विटी म्युच्युअल फंड मर्यादित शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. हे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल किंवा मल्टी कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करते.
उत्तम परतावा कसा मिळवाल :
फोकस्ड म्युच्युअल फंडाकडे आपल्या पोर्टफोलिओमध्ये केवळ काही शेअर्स आहेत. कमी शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यामुळे, फोकस्ड म्युच्युअल फंडांचा यावर लक्ष केंद्रित करण्याचा दृष्टीकोन असतो जेणेकरून ते अधिक चांगली कामगिरी करतील. जर तुमच्या फंड मॅनेजरने शेअर्सची चांगली निवड केली असेल, तर फोकस्ड म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराला चांगला परतावा देऊ शकतात. मात्र, अशा फंडात फारसे वैविध्य नसल्याने जोखमीचा धोकाही अधिक असतो. यात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही फोकस्ड म्युच्युअल फंडात कशी गुंतवणूक करू शकता, हे आम्ही तुम्हाला सांगतो.
फोकस्ड म्युच्युअल फंड म्हणजे काय :
सेबीच्या मते, फोकस्ड म्युच्युअल फंड जास्तीत जास्त ३० शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतात. त्याचबरोबर फोकस्ड म्युच्युअल फंड आपल्या कॉर्पसच्या ६५ टक्के रक्कम शेअर्समध्ये गुंतवू शकतात.
फोकस्ड म्युच्युअल फंडांमध्ये किती जोखीम :
जर तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल आणि पहिल्यांदाच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल, तर तुम्ही फोकस्ड म्युच्युअल फंडांपासून दूर राहायला हवं. मात्र, त्यात गुंतवणूक केल्यास ती दीर्घ मुदतीसाठी म्हणजे ७ ते १० वर्षांसाठी सोडावी. यामुळे जोखीम कमी होईल.
येथे 5 सर्वोत्तम फोकस्ड फंडांची यादी :
* अॅक्सिस फोकस्ड २५ फंड – Axis Focused 25 Fund
* आयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंड – IIFL Focused Equity Fund
* प्रिन्सिपल फोकस्ड मल्टीकॅप फंड – Principal Focused Multicap Fund
* एसबीआय फोकस्ड इक्विटी फंड – SBI Focused Equity Fund
* मोतीलाल ओसवाल फोकस्ड 25 फंड – Motilal Oswal Focused 25 Fund
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.