29 April 2024 5:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका
x

Tax Saving Mutual Fund | 3 वर्षांत या 3 म्युच्युअल फंडांनी पैसा तिप्पट केला, संपत्ती वाढवणाऱ्या फंडाच्या योजना लक्षात ठेवा

Tax Saving Mutual Fund schemes

Tax Saving Mutual Fund | जर तुम्हाला अश्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची असेल ज्यातून तुम्हाला कर सवलत लाभ मिळेल, तर ELSS तुमच्या साठी योग्य पर्याय आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करून, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळू शकते.

गुंतवणूकदारांना 2.5 पट परतावा :
जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला हे देखील माहीत असेल की त्यावरील नफ्यावर तुम्हाला कर आकारला जातो. करदात्यांना लक्षात ठेवून भारत सरकारने ELSS योजना बाजारात आणली आहे जेणेकरून गुंतवणूकदार कर सवलतचा लाभ घेऊन गुंतवणूक करू शकतील आणि चांगला परतावा घेऊ शकतील. ELSS म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास, गुंतवणूकदाराला आयकर कायदा कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. म्हणजेच ELSS वर चांगला परतावा मिळण्यासोबतच गुंतवणूकदारांना कर सवलतही मिळते. नोकरदार लोकांमध्ये आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकामध्ये ही योजना खूप लोकप्रिय आहे कारण त्यावर परतावा चांगला मिळतो आणि कर सवलतही मिळत आहे. ELSS मध्ये असे अनेक फंड आहेत ज्यांनी मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 2.5 पट परतावा दिला आहे.

ELSS चा लॉक-इन कालावधी :
ELSS चे किमान एक्सपोजर 80 टक्के आहे, जे तांत्रिकदृष्ट्या 100 टक्क्यांपर्यंत असू शकते. ELSS हा इक्विटी म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये प्राप्तिकराच्या कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंत कर सूट उपलब्ध आहे. गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करू शकतात. तथापि, 3 वर्षांपर्यंतचा लॉक-इन कालावधी आहे, म्हणजेच तोपर्यंत तुम्ही पैसे काढू शकत नाही. इतर कर बचत पर्यायांच्या तुलनेत याचा लॉक-इन कालावधी सर्वात कमी आहे. त्याच वेळी, बँकेच्या मुदत ठेवीमध्ये 5 वर्षांचा, PPF मध्ये 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. गुंतवणूकदार ELSS मध्ये एकरकमी किंवा दर महिन्याला गुंतवणूक करू शकतात.

ELSS क्वांट टॅक्स प्लॅन :
क्वांट टॅक्स प्लॅन फंडच्या गुंतवणूक योजनांनी मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक 37.12 टक्के परतावा मिळवून दिला आहे. यामध्ये ज्या गुंतवणूकदारांनी या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले होते, त्याना मागील एका वर्षभरात 2.58 लाख रुपयांचा फायदा झाला. त्याच वेळी, 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपीचे गुंतवणूक मूल्य आता 7.50 लाख रुपयांवर गेले आहे.

BOI AXA टॅक्स अॅडव्हांटेज फंड :
BOI AXA Tax Advantage Fund ya योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 29.42 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. या योजनेमध्ये ज्यानी 1 लाख रुपये गुंतवले होते, त्याना एक वर्षनंतर 2.17 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपी चे गुंतवणूक मूल्य 6.16 लाख रुपये झाले आहे.

कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हर फंड :
कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हर फंडने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 26.63 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत ज्यांनी1 लाख रुपये गुंतवणूक केली होती, त्यांना एक वर्ष कालावधी नंतर 2.03 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, 10 हजार रुपयांच्या मासिक एसआयपीचे गुंतवणूक मूल्य 5.84 लाख रुपये झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tax Saving Mutual Fund schemes giving huge returns on long term investment on 4 August 2022.

हॅशटॅग्स

Tax saving mutual fund scheme(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x