28 March 2024 3:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या
x

ELSS Vs Gold Mutual Fund | ईएलएसएस किंवा गोल्ड म्युच्युअल फंडांपैकी कोणती योजना चांगला परतावा मिळवून देईल, जाणून घ्या

ELSS Vs Gold Mutual Fund

ELSS Vs Gold Mutual Fund | जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशाच दोन उत्तम गुंतवणुकीच्या पर्यायांची माहिती देत आहोत. जर तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणूक करत असाल किंवा तुमची गुंतवणूक मजबूत बनवायची असेल तर, म्युच्युअल फंड तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. नफ्याची गुंतवणूक तीच असते जिथे गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे तुमची संपत्तीही वाढते. बाजारात असे काही पर्याय उपलब्ध आहेत जिथे तुम्ही उत्तम परताव्यासाठी गुंतवणूक करू शकता. आज आम्ही तुम्हाला दोन योजनांची माहिती देत आहोत ज्याद्वारे तुम्ही उत्तम परतावा मिळवू शकता. यामध्ये तुम्ही इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) किंवा गोल्ड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता.

ELSS मध्ये गुंतवणुकीचे फायदे :
ELSS गुंतवणुकीचा लॉक-इन कालावधी 3 वर्षांचा असतो . म्हणजे तुम्ही तुमचे गुंतवलेले पैसे ३ वर्षांपर्यंत काढू शकत नाही ते लॉक होऊन जातात. हे या योजनेचे एक चांगले वैशिष्ट्य आहे. इतर योजनांच्या तुलनेत या योजनेचा लॉक-इन कालावधी खूपच कमी आहे.

ELSS SIP प्लॅन :
तुम्ही ELSS मध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP द्वारे किमान 500 पासून गुंतवणूक सुरुवात करू शकता. त्यात तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करता येईल. यामध्ये गुंतवणूकदारांना दोन प्रकारचे पर्याय दिले जातात. पहिला पर्याय ग्रोथ रिटर्न आणि दुसरा पर्याय डिव्हिडंड पेआउट. यामध्ये इतर अनेक फायदे आहेत. कंपन्या लाभांश परतावा पर्यायामध्ये वेगवेगळे फायदे देत असतात. लाभांश पर्याय असलेल्या योजनांमध्ये, लाभांश वर्षातून एकदा दिला जातो. तर, काही योजनांनी वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा लाभांश दिला आहे. त्याच वेळी, आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलत देखील उपलब्ध आहे. जर तुमचा नफा 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर या परिस्थितीत तुम्हाला 10% आयकर भरावा लागेल.

गोल्ड म्युच्युअल फंड प्लॅन :
गोल्ड म्युच्युअल फंड हा गोल्ड ईटीएफचा एक भाग आहे. गोल्ड म्युच्युअल फंड ही गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणारी योजना आहे. गोल्ड म्युच्युअल फंड प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करत नाहीत. गोल्ड म्युच्युअल फंड ही ओपन-एंडेड गुंतवणूक उत्पादने जसे गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये गुंतवणूक करतात. आणि त्यांचे निव्वळ मालमत्ता मूल्य ईटीएफच्या कामगिरी सोबत जोडलेले असते. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही किमान 500 रुपयांपासून सुरुवात करू शकता. जर तुम्ही या योजनेत 3 वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक केली तर ती दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ELSS Vs Gold Mutual Fund return on investment benefits on 4 August 2022.

हॅशटॅग्स

#ELSS Vs Gold Mutual Fund(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x