29 April 2024 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

ब्रेकिंग न्यूज: पर्रिकर म्हणाले, अनिल अंबानींच्या फायद्यासाठी मोदींनी ‘खेळ’ केला: राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल डील प्रकरणावरुन धक्कादायक दावा केला आहे. राफेल करारात मनोहर पर्रिकरांचा कोणताही सहभाग नव्हता असे त्यांनीच मला सांगितल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच केवळ उद्योगपती अनिल अंबानी यांना फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी हा संपूर्ण खेळ रचल्याचे सुद्धा मला पर्रिकरांनी सांगितल्याचा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी सध्या सहकुटुंब गोव्यामध्ये सुटीचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत. काल त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री तसेच माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची सुद्धा विधानभवनातील त्यांच्या कार्यालयात जाऊन सदीच्छा भेट घेतली होती. मात्र त्यानंतर बाहेर पडल्यावर पुढील कार्यक्रमांसाठी उशीर होत असल्याचे सांगत त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्याचे टाळले होते. परंतु, त्यानंतर त्यांनी केरळच्या कोच्चीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या उपस्थित तब्बल ५०,००० कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, ‘मित्रांनो! गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मला स्वतः सांगितले की, नव्या राफेल कराराशी माझा कोणताही संबंध नाही. नरेंद्र मोदींनी केवळ अनिल अंबानी यांना फायदा मिळवून देण्यासाठी हा सर्व खेळ रचल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, गोवा विधानसभेचे उपसभापती आणि भाजपाचे आमदार मायकर लोबो म्हणाले, राहुल गांधी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेण्यासाठी विशेष दौऱ्यावर आले होते. पर्रिकर खुपच साधे-सरळ व्यक्ती असून त्यांच्यासारख्या नेत्याची देशाला आणि गोव्याला अत्यंत गरज आहे. विशेष म्हणजे विचारून देखील त्यांनी राफेल मुद्द्यावर राहुल आणि पर्रिकर यांच्यातील संभाषणाची माहिती दिली नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x