 
						Hot Stocks | मागील एका महिन्यात, या तीन जबरदस्त बँकिंग स्टोक्सनी 25 टक्के पर्यंत उसळी घेतली असून आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून दिला आहे. या दरम्यान सेन्सेक्स निर्देशांकात 8.20 टक्के ची वाढ पाहायला मिळत आहे. तर निफ्टी निर्देशांकात 8.07 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
जागतिक अस्थिरता, संभाव्य मंदीची शक्यता, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे भारतीय तसेच जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. पण आता पुन्हा एकदा शेअर बाजारात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच अनेक कंपन्यांचे शेअर्स आता आपल्याला वाढताना दिसत आहेत. मागील एका महिन्यात, तीन असे जबरदस्त बँकिंग स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे. या दरम्यान सेन्सेक्सने 8.20 टक्के ची वाढ नोंदवली आहे. तर निफ्टीने 8.07 टक्के वाढ नोंदवली आहे. ते चला मग ह्या लेखात आपण पाहूया की ते तीन बँकिंग स्टॉक्स कोणते आहेत?
इंडसइंड बँक :
इंडसइंड बँकेचा शेअर मागील काही काळात 22 टक्के वाढला असून मागील एका महिन्यात शेअर बाजाराच्या NSE बँक निर्देशांकावर इंडसइंड बँकेच्या शेअरची किंमत 858.35 रुपये वरून 1052 रुपये पर्यंत वाढली आहे. म्हणजेच मागील एका महिन्यात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 22.56 टक्के इतका भरघोस परतावा दिला आहे.
IDBI बँक :
IDBI बँकच्या शेअर्समध्ये काही आठवड्यात 25 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील फक्त एका महिन्यात NSE वर IDBI बँकेच्या शेअर्समध्ये 25.08 टक्के वाढ नोंदवली गेली होती. IDBI बँकेचा शेअर 32.70 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 40.90 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
YES बँक :
येस बँकेने मागील काही काळात कमालीची वाढ दर्शवली आहे. गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा देण्याच्या बाबतीत येस बँक अजिबात मागे नाही. मागील एका महिन्यात NSE वर येस बँक कंपनीच्या शेअरमध्ये 22.05 वाढ झाली होती आणि स्टॉक ची किंमत 16.05 रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती. एका महिन्यापूर्वी हा शेअर 13.15 रुपयेवर ट्रेड करत होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		