Multibagger Dividend | छप्पर फाड लाभांश जाहीर, ह्या कंपनीने जाहीर केला आहे 1500 टक्के लाभांश, तुम्हालाही कमाईची संधी

Multibagger Dividend | आज आपण ह्या लेखात अश्या एका जबरदस्त स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 1500 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. हा स्टॉक आहे Divi’s Laboratories. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत Divi’s Laboratories कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 26 टक्के वाढ झाली असून निव्वळ नफा 702 कोटी रुपये पर्यंत गेले आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला तब्बल 557 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
Divi’s Laboratories Stock Price :
फार्मास्युटिकल्स कंपनी Divi’s Laboratories ने जाहीर केलेल्या आपल्या जून 2022 च्या तिमाही निकालात मजबूत नफा नोंदवला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत Divi’s Laboratories चा एकत्रित निव्वळ नफा 26 टक्के वाढला होता. कंपनीने तब्बल 702 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला तब्बल 557 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. जून 2022 च्या तिमाहीत कंपनीच्या महसूलात जवळपास 15 वाढ झाली होती. कंपनीचा महसूल 2254 कोटी रुपये होता, जो मागील वर्षीच्या कालावधीच्या तुलनेत फक्त 1960.6 कोटी रुपये होता.
प्रती शेअर 1500 टक्के लाभांश :
कंपनीने प्रत्येक शेअरवर 1500 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 साठी Divis Laboratories कंपनी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरवर 1500 टक्के लाभांश देणार आहे. म्हणजेच, आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 30 रुपये लाभांश दिला जाणार आहे. लाभांशाची रेकॉर्ड तारीख 12 ऑगस्ट 2022 ठरवण्यात आली आहे. यापूर्वी, ऑगस्ट 2021 मध्ये कंपनीने आपल्या भागधारकांना 20 रुपयांचा अंतिम लाभांश दिला होता. या वर्षी आतापर्यंत डेव्हिस लॅबचे शेअर्स जवळपास 20 टक्के खाली ट्रेड करत आहेत. Divis Laboratories च्या शेअर्सनी स्थापनेपासून आतापर्यंत तब्बल 41140 टक्के परतावा दिला आहे.
कंपनीचे शेअर्स 13 मार्च 2003 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 9.04 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. 12 ऑगस्ट 2022 रोजी दिवसा अखेर कंपनीचे शेअर्स BSE वर 3728.20 रुपयांवर बंद झाले होते. जर तुम्ही 13 मार्च 2003 रोजी डेव्हिस लॅब कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि तुमची गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर तुमची गुंतवणूक सध्या 4.12 कोटी रुपये झाली असती. कंपनीच्या शेअर्सनी आपल्या भागधारकांना मागील 5 वर्षात 487 टक्के भरघोस परतावा मिळवून दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 634.10 रुपयांवर ट्रेड करत होते ते आता 3728.20 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 5425 रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Dividend Devis laboratory share price return on 13 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER