11 May 2025 12:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 9 रुपयांचा पेनी स्टॉक फोकस मध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RAMASTEEL Infosys Share Price | IT शेअर मालामाल करणार; रॉकेट तेजीत होईल कमाई, स्वस्तात खरेदी करा - NSE: DATAPATTNS Data Patterns Share Price | रॉकेट तेजीत आहे हा शेअर, 4.35 टक्क्यांनी वाढला, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: DATAPATTNS BPCL Share Price | होय! तब्बल 44 टक्के परतावा देईल हा सरकारी कंपनीचा शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BPCL National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली
x

सत्ता आल्यावर गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी करणार: जयंत पाटील

कर्जत : देशात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मित मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंतराव पाटील यांनी कर्जत येथील जाहीर सभेत केली. भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मित मृत्यूनंतर उलटसुलट चर्चा प्रसार माध्यमांमध्ये रंगली होती आणि त्यांची ईव्हीएममुळे हत्या झाली, असे हॅकरने म्हटल्यानंतर खळबळ उडाली होती.

भारतातील महत्वाच्या संस्थात्मक रचना मोडीत काढण्याचे काम सध्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केले असल्याचा घणाघात सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर भाषणादरम्यान केला. दरम्यान, देशात स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी कर्जमाफी जर कुणी केली असेल तर तुमचे, माझे नेते शरद पवार साहेबांनीच असं ते म्हणाले. त्यावेळी जवळजवळ ७०,००० कोटी रुपयांची कर्जमाफी बळीराजाला देण्यात आली होती. परंतु सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अजूनही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळालेली नाही, असे सुद्धा जयंत पाटील म्हणाले.

उद्या देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यादरम्यान निवडणूकपूर्व घोषणा होणार आहेत, आणि यापुर्वी देशात कुणीच काही दिलं नाही हे भासवलं जाणार आहे, हे लक्षात घ्या, असे थेट आवाहन सुद्धा यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थितांना केले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या