PPF Investment | या योजनेत फक्त 3000 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही लाखोंचा परतावा मिळवू शकता, योजनेबद्दल जाणून घ्या
PPF Investment | जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल, तर तुमच्याकडे गुंतवणुकीचा चांगला एक चांगला पर्याय असला पाहिजे. तुम्ही गुंतवणुकीसाठी एखादे साधन शोधत असाल तर, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही योजना तुम्हाला धमाकेदार परतावा देईल एवढं नक्की.
पीपीएफ गुंतवणुकीने श्रीमंत कसे व्हावे :
कोणताही भारतीय नागरिक ,लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेत 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी देण्यात आला आहे आणि या योजनेत गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इतर गुंतवणुकीपेक्षा या योजनेत तुम्हाला सर्वात जास्त व्याज परतावा उपलब्ध आहे. सध्या या योजनेत वार्षिक 7.1 टक्के व्याज चक्रवाढ पद्धतीने दिले जाते. हा व्याज परतावा बँक मुदत ठेवींपेक्षा खूप जास्त आणि चांगला आहे. या योजनेत तुम्ही महिन्याला फक्त 1 हजार रुपयांची गुंतवणूक केली ते पुढील 15 वर्षात तुम्हाला 3.21 लाख रुपये मिळतील.
3000 च्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती पैसे मिळतील?पीपीएफमधील गुंतवणूक किमान 500 रुपयांपासून सुरू होते. जर तुम्ही दरमहा फक्त 500 रुपये गुंतवणूक केले तर 15 वर्षांनंतर तुमच्याकडे सुमारे 1.6 लाख रुपयांचा फंड तयार झाला असेल. त्याच वेळी, दरमहा 2 हजार रुपये गुंतवून 15 वर्षांत सुमारे 6.43 लाख रुपयांचा फंड तयार होईल. तुम्ही 3 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास पुढील पंधरा वर्षात तुम्हाला 9.64 लाख रुपये मिळतील. या योजनेत, एका आर्थिक वर्षात गुंतवणुकीची कमाल मर्यादा 1.5 लाख रुपये आहे.
ठराविक मासिक रक्कम गुंतवणूक करून 15 आणि 20 वर्षांनंतर तुम्हाला किती परतावा मिळेल जाणून घेऊ : मासिक 500 रुपये – 15 वर्षांनी मिळणारा परतावा 1.6 लाख रुपये, 20 वर्षांनी मिळणारा परतावा 2.65 लाख रुपये
* 1 हजार रुपये ; 3.21 लाख रुपये ; 5.30 लाख रुपये
* 2 हजार रुपये ; 6.43 लाख रुपये ; 10.60 लाख रुपये
* 3 हजार रुपये : 9.64 लाख रुपये ; 15.91 लाख रुपये
पोस्ट ऑफिस आणि बँकमध्ये PPF खाते सुविधा :
जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किंवा बँकेत जाऊन तुम्ही पीपीएफ योजना खाते उघडू शकता. तुमच्या स्वतःच्या नावाशिवाय, तुम्ही अल्पवयीन असाल तर तुमच्या मुलांच्या नावानेही तुम्ही योजना खाते उघडू शकता. पण, काळजीवाहू म्हणून, मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंत तुम्हाला खाते नियंत्रित करावे लागेल. नियमांनुसार, हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नावाने पीपीएफ गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध येत नाही.
मॅच्युरिटीवर 5 वर्षांची मुदतवाढ :
PPF खात्यावर 15 वर्षांचा लॉक इन कालावधी किंवा परिपक्वता कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यानंतरही, तुम्ही तुमची गुंतवणूक सुरू पुढील काळासाठी सुरू ठेवू शकता. म्हणजे तुम्ही ही गुंतवणूक योजना दर 5 वर्षांसाठी पुढे वाढवू शकता. तुम्ही एकूण 20 वर्षांसाठी या योजनेत ठराविक रक्कम गुंतवणुक करू शकता. या काळात गुंतवणूक वाढवताही येते. तथापि, मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्याच्या 1 वर्ष आधी, तुम्हाला एक अर्ज सादर करणे आवश्यक आहे की तुम्हाला योजनेची मुदतवाढ हवी आहे. 20 वर्षे पूर्ण झाल्यावर, तुम्ही पुन्हा 5 वर्षांसाठी कालावधी वाढवू शकता.
5 वर्षांचा लॉक इन कालावधी :
पीपीएफ खात्यातील पैसे काढण्यापूर्वीचा लॉक-इन कालावधी 5 वर्ष निश्चित करण्यात आला आहे. म्हणजे PPF खाते उघडल्यानंतर किमान 5 वर्षांपर्यंत या खात्यातून तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही फॉर्म नंबर 2 भरून प्री-विड्रॉवल अर्ज करू शकता. तथापि, योजनेचा मुदत पूर्ती कालावधी एकूण 15 वर्ष आहे.
PPF वर EEE कर सूट :
PPF योजना कराच्या EEE श्रेणीत येते. म्हणजे, या योजनेत तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळेल. याशिवाय तुमच्या गुंतवणुकीवर मिळणारे चक्रवाढ व्याज परतावा आणि मॅच्युरिटीवर मिळणारी संपूर्ण रक्कमही करमुक्त असेल. त्यामुळे, दीर्घकालीन फायद्यांनुसार पीपीएफ गुंतवणूक एक चांगला पर्याय मानला जाती.
कायदेशीर सुरक्षा :
तुमचे PPF खाते कोणीही जप्त करू शकत नाही.पीपीएफ खाते कर्ज किंवा इतर दायित्वाच्या वेळी कोणत्याही न्यायालयाद्वारे किंवा आदेशाद्वारे कोणालाही जप्त करता येणार नाही. या बाबतीतही PPF योजनेत कायदेशीर सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
पीपीएफ खात्यावर स्वस्त कर्ज उपलब्ध :
पीपीएफ योजनेत जमा केलेल्या पैशावर स्वस्त कर्ज सुविधा उपलब्ध आहे. मात्र,एक अट आहे. ज्या आर्थिक वर्षात तुम्ही योजना खाते उघडले असेल ते वर्ष वगळता पुढील वर्षापासून फक्त पाच वर्षांच्या कालावधीसाठी पीपीएफकडून कर्ज घेण्यास तुम्ही पात्र असाल. जर तुम्ही जानेवारी 2017 मध्ये PPF योजना खाते उघडले असेल आणि तुम्हाला 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2022 पर्यंत कर्ज हवे असेल तर तुमच्या एकूण ठेवीवर जास्तीत जास्त 25 टक्के पर्यंत तुम्ही कर्ज मिळवू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | PPF investment scheme for long term benefits on 17 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट
- Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार?