28 April 2024 10:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Viral Video | कुत्र्याची पिल्ले मागे मागे जाऊ पाहतात, कुत्रा परतून हूल देतो, पळा घरात पहिले... खूप हसवतील कार्टून पिल्ले

Viral Video

Viral Video | प्राण्यांशी संबंधित सर्व प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातली काही सरप्राईजेस इतकी गमतीशीर असतात की, ती पाहून कुणाचाही दिवस उजाडतो. आजकाल इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे. हा व्हिडिओ इतका अप्रतिम आहे की, तो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचं बालपणही आठवत असेल. इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ कुत्र्यांशी संबंधित आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला रस्त्याच्या कडेला ६-७ लहान पिल्ले आवाज करताना दिसतील, मगच त्यांचं काय होतं ते पाहून तुम्हाला खूप हसू येईल.

काय आहे संपूर्ण प्रकरण :
प्रत्यक्षात ही पिल्ले एका घराच्या प्रवेशाजवळ उभी राहून आईला पाहून आवाज काढत असतात. मग एक मोठा कुत्रा तिथे येतो आणि त्यांचा आवाज ऐकून त्यांना जोरजोरात भुंकून मागे फिरण्यासाठी घाबरवण्याचा प्रयत्न करतो. मग काय, कुत्र्याचा आवाज ऐकताच पिल्ले लगेच तिथून एकामागे एक एखाद्या कार्टून सारखे एका छोट्या होलमधून घरात पळतात.

हा मजेशीर व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी आपल्या ट्विटर पेजवर शेअर केला आहे, ज्याकडे लोक त्यांच्या बालपणाकडे पाहत आहेत. युझर्सचं म्हणणं आहे की, लहानपणीही असंच त्यांच्याबाबतीत व्हायचं. एका युझरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, “लहानपणी पप्पा जेव्हा बाहेर जायचे तेव्हा मी आणि माझा भाऊ त्याच्या मागे आवाज करून बाहेर जाण्याचा हट्ट करायचो. यानंतर आमचे वडीलही अशाच काही जोरात आम्हाला शिव्या देण्याचे नाटक करून घाबरवायचे. त्याचबरोबर आणखी एका युझरने लिहिले, ‘मानव असो वा प्राणी, वडिलांची भीती सर्वांमध्ये समान असते.

इतकंच नाही तर स्वत: आयपीएसने या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिलं, ‘ही तर भारतीय पालकांची ‘टेरर’ आहे!’. अवघ्या 6 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 497 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तसेच शेकडो लोकांनी लाईकही केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक एकापेक्षा एक मजेदार कमेंट करत आहेत. मात्र, हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला असून तो पाहिल्यानंतर लोकही खळखळून हसत आहेत.

पहा व्हिडिओ :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of dog and cute puppies funny video viral on social media check details 18 August 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x