
Stocks To Buy | जून तिमाहीत, FII (परकीय गुंतवणूक संस्था) ने टाटा समूहातील या कंपनीचा त्यांचा हिस्सा 14.99 टक्के पर्यंत वाढवला होता. आधीच्या तिमाहीत FII ची गुंतवणूक फक्त 13.62 टक्के होती. त्याच वेळी, म्युच्युअल फंडांनीही आपली गुंतवणूक वाढवून 7.36 टक्के वरून 7.58 टक्के पर्यंत नेली आहे.
टाटा ग्रुप स्टॉक:
टाटा ग्रुपचा हा शेअर आज आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी किमतीवर पोहोचला आहे. आपण ज्या शेअर बद्दल चर्चा करत आहोत तो आहे टाटा केमिकल्स. टाटा केमिकल्सच्या शेअर्सने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1,182.40 रुपयांचा नवीन उच्चांक गाठला. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा केमिकल्स च्या शेअर्स मध्ये बीएसईवर 6 टक्क्यांची भरघोस वाढ दिसून आली होती. 12 ऑगस्ट 2022 रोजी टाटा समूहाच्या कमोडिटी केमिकल कंपनीच्या स्टॉकने 1,159.95 रुपयेचा सर्वकालीन उच्चांक पार केला होता. इंट्राडेमध्ये कंपनीचे शेअर्स 1,134 रुपये वर ट्रेड करत आहेत. ब्रोकरेज फर्म जिओजितच्या संशोधनानुसार, कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1340 पर्यंतच्या लक्ष्य किंमतीपर्यंत उसळी घेऊ शकतात.
चालू आर्थिक वर्षाच्या जूनमध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीत टाटा केमिकल्सचा निव्वळ नफा 86.25 टक्क्यांनी वाढून 637 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीने मागील आठवड्यात स्टॉक एक्सचेंजला पाठवलेल्या माहितीमध्ये असा खुलासा केला आहे की टाटा केमिकल्सने मागील आर्थिक वर्षाच्या 2021-2022 च्या याच जून तिमाहीत 342 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 34.15 टक्क्यांनी वाढले 3,995 कोटी रुपये पर्यंत गेले आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न याच कालावधीत 2,978 कोटी रुपये होते.
FII ने वाढवली गुंतवणूक :
2022 जूनच्या तिमाहीत, FII ने या कंपनीतील आपला गुंतवणूक हिस्सा 14.99टक्के पर्यंत वाढवला असल्याचे दिसत आहे. आधीच्या तिमाहीत FII चा गुंतवणूक वाटा 13.62 टक्के होता. त्याच वेळी, म्युच्युअल फंडांनीही आपल्या गुंतवणूक हिस्सा 7.36 टक्के वरून 7.58 टक्के पर्यंत वाढवला आहे.
कंपनीचा व्यवसाय :
टाटा केमिकल्स लिमिटेड कंपनी ग्लास, डिटर्जंट, औद्योगिक आणि रासायनिक क्षेत्रातील उद्योगात प्रचंड मोठी कंपनी आहे. टाटा केमिकल्स कंपनी रॅलिस इंडिया लिमिटेड या उपकंपनीद्वारे पीक संरक्षण व्यवसायात मजबूत व्यापार करत आहे. टाटा केमिकल्सकडे पुणे आणि बंगळुरू या ठिकाणी जागतिक दर्जाच्या संशोधन आणि विकास केंद्र आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.