29 April 2024 2:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

राहुल गांधीनी गडकरींना नम्रपणे विचारलं, 'नितीनजी तो बेरोजगारीचा उल्लेख राहून गेला'

नवी दिल्ली : काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘भारतीय जनता पार्टीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एकटेच धाडसी नेते आहेत’, असे म्हणून त्यांची उपरोधिकपणे कौतुक केले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी आणि राहुल गांधी यांच्यादरम्यान सोमवारी टिष्ट्वटरवरून कलगीतुरा रंगला.

नितीन गडकरी यांनी ‘जो घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार?, असे विधान शनिवारी रात्री नागपूरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केल्याचे वृत्त सोमवारी प्रसिद्ध झाले होते. नेमका त्यावरून राहुल गांधी व गडकरी यांनी परस्परांविरुद्ध ट्विटर वॉर केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, गडकरी यांनी प्रसार माध्यमांनी आपले वक्तव्य विकृत स्वरूपात प्रसिद्ध केल्याचेही नमूद केले.

राहुल गांधींना प्रतिउत्तर देताना गडकरी यांनी लिहिले, ‘ मी काही विषयांवर बोलावे असे तुम्ही सुचविले आहे. त्यापैकी राफेलविषयी मी असे सांगेन की, देशाच्या हिताला अग्रक्रम देऊनच आमच्या सरकारने हा करार केला. तुमच्या सरकारच्या धोरणांनी शेतकºयांना संकटात टाकले, त्यांना त्यातून बाहेर काढण्याचे काम मोदीजी करत आहेत.’ मोदींच्या प्रामाणिकपणाने विरोधक हताश झाले आहेत, असा टोला लगावत गडकरी यांनी भविष्यात राहुल गांधी अधिक तर्क संगत व जबाबदारीने वागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु, नितीन गडकरी यांच्या उत्तरानंतर देखील राहुल गांधी गप्प बसले नाहीत. सकाळच्या आपल्या पहिल्या टिष्ट्वटमध्ये बेरोजगारीचा उल्लेख करण्याचे राहून गेल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x