13 May 2024 2:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | रॉकेट स्पीडने परतावा देणारे टॉप 10 शेअर्स, प्रतिदिन 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell? Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस? Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार घसरण, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या
x

आदित्य ठाकरेंच्या सभांना राज्यभरात जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जळफळाट?, दौऱ्यावरून टीका

Union minister Narayan Rane

Union Minister Narayan Rane | खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, दसरा मेळावाही त्यांचाच होणार असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसंच जर दसरा मेळावा झाला तर तो एकनाथ शिंदेंचाच असेल. त्यात मला बोलावलं तर मी देखील जाईन असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

शिवसेनेचा पूर्वीचा शिवसैनिक कसा होता? नेता कसा होता? मुख्यमंत्री कसा होता त्याचा प्रत्यय मी तिथे घडवून देईन. जुने शिवसैनिकच त्या मंचावर दिसतील. प्रामाणिक, निष्ठावान, जाणते शिवसैनिक हे तिथे मंचावर दिसतील. या व्याख्येत जे बसत नाहीत ते घरी असतील असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री होते ते या अभद्र युतीमुळेच :
मोदींसोबत युती करायची, भाजपशी हातमिळवणी करायची आणि निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी अभद्र युती केली. उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते ते या अभद्र युतीमुळेच. नाहीतर एक दिवसही त्या पदावर बसण्याची पात्रता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. जो व्यक्ती मंत्रालयात जात नाही.

कॅबिनेटमध्ये जात नाही. सभागृहात बसत नाही, असला कसला मुख्यमंत्री? आता खोके वगैरे टीका सुरू केली आहे. काय त्याला अर्थ आहे का. एकनाथ शिंदेंना कंत्राटी सरकार यांनी म्हटलं होतं. मात्र गणरायाने कंत्राटी सरकार घालवलं. इतका अपमान झाल्यावर तरी गप्प घरात बसा असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसंच शिंदे-फडणवीस सरकार हे आता चांगलं कामकाज करतील अशी अपेक्षा मला आहे.

सत्ता गेली तरी एक उंदीर फिरतोय राज्यात :
उद्धव ठाकरेंचा अपमान झाला, एवढी सत्ता गेली तरीही एक उंदीर राज्यात फिरतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जोरावर. फिरू द्या त्यामुळे काहीही फरक पडणार नाही असं म्हणत नारायण राणे यांनी नाव न घेता आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवर टीका केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Union minister Narayan Rane political attack on Aaditya Thackeray check details 31 August 2022.

हॅशटॅग्स

#Union minister Narayan Rane(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x