15 December 2024 12:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज
x

नोटबंदी आणि जीएसटीमुळेच देशात आर्थिक मंदी: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी

GST, demonetization, PM Narendra Modi, Central MInister pratap chandra sarangi

नवी दिल्ली: सध्या देशभरात मंदीवरून वातावरण ढवळून निघालेलं असताना त्यात सत्तेतील मंत्री देखील मोदी सरकारला अडचणीत टाकत आहेत. देशभरात अनेक उद्योग एकामागे एक बंद पडत चालले आहेत. आता पर्यंत लाखो लोकांनी त्यांचा रोजगार गमावला असून रोजच्या उपजीविकेचं साधन देखील हिरावलं गेलं आहे. वाहन उद्योग आणि वस्त्रोद्योग उद्योगाचे तर तीन तेरा वाजल्याचं चित्र आहे आणि दुसरीकडे बांधकाम क्षेत्र देखील खप नसल्याने डबघाईला आलं आहे.

दरम्यान, देशभरातील विरोधकांनी नेहमीच मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांना जवाबदार धरून तेच मंदीचं मूळ कारण असल्याचं म्हटलं आहे. सरकार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आकड्यांची लपवालपवी करत असल्याचं निदर्शनास आलं आहे आणि त्यात केंद्रीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीतून सरकारचं बिंग देखील फुटलं आहे. देशाच्या जीडीपीत पहिल्या तिमाहीत प्रचंड घट झाली आणि तो थेट ५ वर येऊन कोसळला आणि सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांची पोलखोल झाली.

त्यात सर्वाधिक दोष हा घाईघाईत अमलात आणलेल्या जीएसटी आणि नोटबंदीच्या निर्णयाला दिला गेला. नोटबंदी आणि जीएसटी ही देशातील आर्थिक मंदीची प्रमुख कारणे असल्याचे, देशातील सर्वसामान्यांनंतर आता भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनेच मान्य केले आहे. शनिवारी मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील इचावार येथील केंद्रीय ग्रामोद्योग आयोगात तपासणीसाठी आलेले केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

देशात आलेल्या आर्थिक मंदीला मोदी सरकारने घेतलेले निर्णय कारणीभूत असल्याचा आरोप आतापर्यंत विरोधकांकडून होत होता. मात्र आता मोदी सरकारमध्ये मंत्री असलेले प्रतापचंद्र सारंगी यांनी सुद्धा, देशातील आर्थिक मंदीला नोटबंदी आणि जीएसटी कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. मात्र यावर मात करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचा दावा सुद्धा त्यांनी यावेळी केला.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x