18 June 2021 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
मोदींच्या लोकप्रियतेत घट | देशाची लोकसंख्या १२५ कोटी | फक्त २१२६ भारतीयांनी ठरवलं मोदी जगात लोकप्रिय केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार BHR घोटाळा | गिरीश महाजन समर्थकांवर काल कारवाई झाल्यानंतर नाथाभाऊंनी शरद पवारांची भेट घेतली रुग्नाला १ केळ द्यायला ढीगभर भाजप-RSS कार्यकर्ते उपक्रम | अन भातखळकरांची काँग्रेसच्या त्या उपक्रमावर टीका मुंबईकरांनो मुलांची काळजी घ्या | ब्लॅक फंगसमुळे ३ मुलांवर शस्त्रक्रिया | डोळे काढावे लागले अमेरिका | कोरोना लसीनंतर आता कोविड-19 च्या टॅबलेट तयार करणार | संशोधनासाठी 3 अब्ज डॉलर्सचा निधी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खुशखबर | आता शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार
x

नोटबंदीचा हेतूच फसला! चलनातील नोटांची संख्या पुन्हा वाढली: आरबीआय अहवाल

Narendra Modi, Demonetization, RBI Report

नवी दिल्ली : देशातील रोख रक्कमेत होणार्‍या व्यवहारांमुळे काळ्या पैशाच्या निर्मितीला चालना मिळते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदी जाहीर केली. मात्र रोख रक्कमेवर मर्यादा घालण्याचा हा प्रयत्न पूर्णपणे फसला. मार्च २०१९ पर्यंत नोटांचे प्रमाण १९.१४ टक्क्यांनी वाढले आहे. चलनातील एकूण नोटा २१.४१ लाख कोटी एवढ्या आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या अहवालात ही नोटांची संख्या देण्यात आली आहे. नोटबंदी होण्यापूर्वी ४ नोव्हेंबर २०१६ रोजी भारताच्या अर्थव्यवस्थेत १७.९७ लाख कोटी रुपयांची रोकड होती. नोटबंदीनंतर नवीन नोटा छापण्यास प्रचंड वेळ लागत असल्यामुळे नोटांच्या रोकडीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र गेल्या दोन वर्षांत हे नोटांच्या रोकडीचे प्रमाण पूर्वीपेक्षाही वाढले आहे.

भारतातील लोक आजही सर्व व्यवहार रोखीने करतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेत रोकड वाढते. नरेेंद्र मोदी यांनी नोटबंदी केल्यानंतर बहुतेक व्यवहार डिजिटल करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्नही फारसा यशस्वी झालेला नाही. नोटबंदीनंतर ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून मोदींनी संपूर्ण देशाला नोटांसाठी बँकेबाहेर रांगा लावाव्या लागल्या होत्या व रांगेत अनेकजण मृत्यू पावले होते. मोेदींची नोटबंदी पूर्णपणे फसली हेच यातून सिद्ध होते.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1593)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x