3 May 2024 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

विधानसभेच अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करणार: अशोक चव्हाण

औरंगाबाद : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सध्या सत्ताधाऱ्यांच्या गोटात सुरू आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे २८ फेब्रुवारी रोजी राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने जोरदारपणे तयारीला लागा असे आदेश अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

त्यामुळे काही करून मतांचे विभाजन टाळा आणि भारतीय जनता पक्ष – शिवसेनेला पाडा,’ असे थेट आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केले. औरंगाबाद येथील राजीव गांधी स्टेडयमवर गुरुवारी काँग्रेस आयोजित जाहीर सभेत ते संवाद साधत होते. दरम्यान त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. तसेच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना उद्देशून ते म्हणाले की, ‘वंचित बहुजन आघाडीला माझी हात जोडून विनंती आहे की, भारतीय जनता पार्टीला मदत होईल, असे काही तुम्ही करू नका. त्यात केवळ तीस टक्के मतांवर भाजपचे सरकार देशात आलेले. त्यामुळे उर्वरित ७० टक्के मते आता काही करून एकत्र राहिली पाहिजेत.

दरम्यान प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी मी स्वतः प्रकाश आंबेडकर यांच्या घरी एकवेळा नव्हे, तर तब्बल ५ वेळा गेलो. कारण जागावाटप म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. स्वत: प्रकाश आंबेडकर हे खासदार बनून लोकसभेत जावेत, ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. तसेच देशात काँग्रेस RSSच्या विरोधात काल होता, आज आहे आणि उद्याही राहील असे स्पष्ट केले.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x