28 April 2024 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल
x

SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या या योजनेत 300 रुपयांच्या गुंतवणुकीवर 6.3 कोटी रुपये परतावा मिळतोय, तुम्हालाही बनवतील श्रीमंत

SBI mutual fund

SBI Mutual Fund | जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी जबरदस्त परतावा देणारा गुंतवणूक पर्याय शोधत असाल, तर अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला SBI च्या एका खास म्युच्युअल फंड योजनेबद्दल माहिती देणार आहोत. SBI च्या या म्युच्युअल फंड योजनेचे नाव आहे, “SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ म्युच्युअल फंड”. या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करून, तुम्ही मुदतपूर्तीच्या वेळी 6.3 कोटी रुपयांपर्यंतचा परतावा मिळवू शकता.

SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ म्युच्युअल फंड :
SBI च्या या SIP म्युच्युअल फंड योजनेत अनेक लोक गुंतवणूक करतात. एसबीआयच्या म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना मागील तीन वर्षांत 29.26 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. दुसरीकडे, जर आपण मागील 5 वर्षांचा विचार केला तर, या SBI च्या म्युचुअल फंड योजनेचा वार्षिक परतावा 27.27 टक्के राहिला आहे. अशा परिस्थितीत दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही योजना तुमच्यासाठी जबरदस्त पर्याय ठरू असू शकते.

6.3 कोटी रुपयांचा परतावा :
6.3 कोटी रुपयांचा परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला या म्युच्युअल फंड योजनेत पुढील 30 वर्षांसाठी दरमहीन्याला नियमित 9 हजार रुपये गुंतवावे लागतील. याशिवाय, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दरवर्षी 15 टक्के अंदाजे परतावा मिळेल अशी अपेक्षा ठवली तर दीर्घकाली तुमचा परतावा सहा कोटी पेक्षा जास्त होऊ शकतो.

समजा, जर तुम्ही SBI च्या या म्युच्युअल फंड योजनेत दररोज 300 रुपये बचत करून गुंतवणूक केली, तर अशा परिस्थितीत तुम्ही 30 वर्षांनंतर एकूण 6.3 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता.

आनंदी जीवन जगू शकता :
पूर्ण गुंतवणुकीच्या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक 32.4 लाख रुपये जमा होईल. त्याच वेळी, तुमच्या गुंतवणुकीवर 6 कोटी रुपयांचा व्याज परतावा जोडला जाईल. अशा परिस्थितीत तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून भविष्यात भरघोस परतावा मिळवू शकता. योजनेच्या मुदतपूर्तीच्या वेळी मिळालेल्या या पैशातून तुम्ही तुमचे आर्थिक जीवन आणि पुढील भविष्य सुरक्षित करू शकता आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आनंदी जीवन जगू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI mutual fund investment long term return and benefits on 8 September 2022.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x